

मुंबईकरांचा प्रवास महागला
आजपासून मुंबईत एन्ट्री करणं महाग झालं
१ ऑक्टोबरपासून मुंबई टोल दरवाढ
मुंबईतील ५ टोलनाक्यांवर नवीन टोल दर
वाशी, ऐरोली, मुलुंड, दहिसर आणि एलबीएस टोलनाक्याचे नवे दर
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागला असून त्यांच्या खिशाला कात्री लागली. मुंबईच्या वेशीवरील ५ टोलनाक्यावरील टोलदरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहीसर यां ५ टोलनाक्यावर नवीन दर जारी केले आहेत. मिनी बस, ट्रक, बस आणि अवजड वाहनांच्या दरामध्ये १५ ते ३५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनचालकांना प्रवासादरम्यान जास्त पैसे माजावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या ५ टोलनाक्यावरील टोलच्या दरात वाढ केली. १ ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून टोलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या टोलनाक्यांवर मिनी बस आणि एल.सी.व्ही वाहनांसाठी ९० रुपये टोल आकारला जाणार आहे. ट्रक आणि बससाठी १८० रुपये टोल आकारला जाणार आहे. तर अवजड वाहनांसाठी २२५ रुपये टोल आकारला जाणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधले आहेत. यासाठी आलेला खर्च वसूल करण्यासाठी वाशी, ऐरोली, मुलुंड, एलबीएस आणि दहिसर या ५ टोलनाक्यांची उभारणी करत टोल वसुली केली जात आहे. महत्वाचे म्हणजे २०२७ पर्यंत ही टोलवसुली सुरू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रवास करताना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार असल्यामुळे वाहन चालकांचे टेन्शन वाढले आहे.
मुंबईच्या वेशीवर असलेल्या या टोलनाक्यांवर आधी मिनी बस, एल. सी. व्ही. वाहनांना ७५ रुपये टोल आकारला जात होता. ट्रक बस यासारख्या वाहनांना १५० रुपये टोल आकारला जात होता. अवजड वाहनांसाठी १९० रुपये टोल भरावा लागत होता. आता नव्या दरांनुसार, एल.सी.व्ही वाहनाच्या दरात १५ रुपयांची, ट्रक- बसच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता नव्या नियमानुसार वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.