Alisha Khedekar
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या काळात अनेक मार्गांवर टोलमाफी मिळणार आहे.
११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
मुंबई–गोवा महामार्ग,मुंबई–बंगळुरू ,अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफी लागू राहणार आहे.
‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ या आशयाचा स्वतंत्र स्टिकर किंवा पास वाहनांसाठी देण्यात येणार आहे.
पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौक्या आणि आरटीओ कार्यालयांमध्ये गणेशभक्तांसाठी टोलमाफीचे पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
टोलमाफीच्या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार असून, तपासणीवेळी तो दाखवावा लागेल.
विशेष म्हणजे हा पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे कोकणातून परततानाही टोलमाफी मिळणार आहे.