Mumbai Crime News : मुंबईत टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील चौघांनी घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Crime News : मुंबईत किरकोळ वादातून ४२ वर्षीय टॅक्सी चालकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mumbai Crime News : मुंबईत टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील चौघांनी घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary

साकीनाका परिसरात जेवण आणण्यावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय टॅक्सी चालकाची हत्या

आरोपींनी हात, पाय आणि बांबूच्या काठीने मारहाण करून केली हत्या

पोलिसांनी चार आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण

मुंबईतील साकीनाका परिसरातून धक्कदायक घटना घडली आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह म्हटलं जात मात्र याचं अन्नाच्या शुल्लक कारणावरून ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी एकाच खोलीत राहणारी ४ टॅक्सी चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही कुर्ला-अंधेरी रोड साकीनाका येथे घडली आहे. साकीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका सोसायटीत ५ टॅक्सी चालक एकत्र एका रूममध्ये राहायचे. या ५ जणांपैकी जावेद खानला बाकीच्या चौघांनी जेवण आणायला सांगितले. मात्र जावेदने जेवण न आणल्याने या ५ जणांमध्ये वाद निर्माण झाला.

Mumbai Crime News : मुंबईत टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील चौघांनी घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर
Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? १५ जिल्ह्यात धो धो पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

हा वाद इतका वाढला की या ५ जणांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यादरम्यान आरोपींनी खानवर हात, पाय आणि बांबूच्या काठीने हल्ला केला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली. या मारामारीत खानचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Mumbai Crime News : मुंबईत टॅक्सी चालकाची निर्घृण हत्या, एकाच कुटुंबातील चौघांनी घेतला जीव, धक्कादायक कारण आले समोर
Shocking News : चौथीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?

मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच खान याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितले. या घटनेप्रकरणी खानच्या रुमध्ये राहणाऱ्या चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकसूद खान, मोहम्मद साहेबाज खान, जमाल हुसेन खान, सज्जाद हुसेन खान आणि मोहम्मद आरिफ हुसेन खान या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या आरोपींना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com