दानपेटी भरल्यानंतर बोटाच्या कैचीने पैसे काढायचे; मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ८०,००० रुपयांची चोरी, ८ जणांना अटक

Siddhivinayak Temple Donation Theft Mumbai: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामधून कर्मचारीच दानपेटीतील ₹80,000 च्या चोरीमध्ये अडकले; पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून तपास सुरू आहे.
Police investigating the theft of ₹80,000 from Siddhivinayak Temple donation box in Mumbai.
Police investigating the theft of ₹80,000 from Siddhivinayak Temple donation box in Mumbai.saam tv
Published On

राज्याच्या राजधानी मुंबईमध्ये असलेल्या कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान सिद्धिविनायक मंदिरामधून कर्मचाऱ्यांनीच चक्क दानपेटीतील पैशांवर डल्ला मारण्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली होती. मंदिराच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थापनासाठी नेमलेल्या एका कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याचे आढळले होते. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात अधिक माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

Police investigating the theft of ₹80,000 from Siddhivinayak Temple donation box in Mumbai.
Mumbai Crime News: अश्लिल व्हिडीओ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगचा पर्दाफाश; पोलिसांकडून ३ कलाकारांना अटक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मंदिरातील काही कर्मचाऱ्यांनीच संघटित पद्धतीने चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण ८ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील दानपेटी भरल्यानंतर ती दुसऱ्या खोलीत नेली जात असताना आरोपी कर्मचारी बोटाच्या कैचीच्या साहाय्याने त्यातून पैसे काढत होते. ही चोरी एक-दोन वेळा नव्हे, तर मागील दोन महिन्यांपासून सुरू होती. विशेष म्हणजे आरोपी आळीपाळीने चोरी करत आणि नंतर पैसे आपापसात वाटून घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

Police investigating the theft of ₹80,000 from Siddhivinayak Temple donation box in Mumbai.
Pune Local Mega Block: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज दिवसभर रेल्वेचा मेगाब्लॉक; पुणे- लोणावळा लोकल रद्द; वाचा सविस्तर..

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ८० हजार रुपये हस्तगत केले असून आणखी रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून काहींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Police investigating the theft of ₹80,000 from Siddhivinayak Temple donation box in Mumbai.
Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांना आणखी एक धक्का, महिला प्रदेशाध्यक्षपद जाणार, मोठी अपडेट आली समोर

अटकेत असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे

राजेंद्र पेंडूरकर

शरद घाडी

समीर शिवलकर

अरविंद काडगे

अनिल राहाटे

पद्माकर आडकर

अभिषेक मुळीक

महेंद्र भाईजे

सदर घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून मंदिर प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com