.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा त्यांचा डाव असल्याचा राज ठाकरेंचा आरोप
राज ठाकरे यांचा केंद्र आणि भाजपवर थेट निशाणा
मराठी माणसाने वेळीच जागं व्हावे असा सल्ला राज ठाकरेंनी दिला
मुंबई आणि मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र
मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली. 'दैनिक सामना'च्या माध्यमातून संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुंबईच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार फटकेबाजी केली. 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. मराठी माणसाने वेळीच जागे व्हायला हवा. मराठी माणसाला आता हे समजत नाही पण कालांतराने त्यांना घोडचुका कळतील.' असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडले.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप करत राज ठाकरे म्हणाले की, 'जुनी जखम जी आहे ना, मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं. हे जे स्वप्न आहे, ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठी या लोकांचा खटाटोप सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जसं मुंबई वेगळी करणं, गुजरातनं मागणं असं जे वातावरण होतं, तेच आज आहे. मुंबई वेगळी करणं ही ज्यांची इच्छा आहे तेच केंद्रात आहेत, राज्यातही तेच आहेत आणि महानगरपालिकांमध्येही तेच सत्तेत आले तर मला असं वाटतं की, मराठी माणूस काहीच करू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींकडे हतबलतेने पाहणं हे आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत.'
मराठी माणसाने एकत्र येऊ नये यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी थेट आरोप केला की,'मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत. मग त्यासाठी जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं, जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावर बसवणं. त्यातून भांडणं, वाद, मारामाऱ्या करवून महाराष्ट्र मराठी म्हणून एकत्र राहता कामा नये यासाठी त्यांचं सगळं राजकारण सुरू आहे.'
मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर भारतातून दररोज लोंढेच्या लोंढे मुंबईत येत आहेत याकडे पुन्हा राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, 'बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय. नुसतं लोकसंख्येचं प्रमाण वाढतंय असं नाही. त्यांची दादागिरी पहा. ‘मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर हिंदू करणार.’ अशी वाक्ये कशी येऊ शकतात? हे कधीपासून सुरू झालं? ही माणसं फक्त रोजीरोटीसाठी येत नाहीएत, हे आपापले मतदारसंघ बनवतायत.'
मराठी माणूस चुका करत आहे पण त्यांना कालांतराने त्यांनी केलेल्या घोडचुका कळतील असे स्प्टष्ट मत राज ठाकरे यांनी मांडले. संयुक्त मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी मुंबईतील मराठी माणसाबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की,'ही माणसं जी आहेत ना, ती बसवलेली माणसं आहेत. आणि हे जागा दाखवत नाहीत. ते जागा पाहतात. ह्यांच्याकडं सह्यांसाठी फक्त फायली येतात आणि सांगितलं जातं की, याच्यावर सही कर. आपल्याच लोकांना, इकडच्या मराठी लोकांना समजत नाही आहे की, आपण काय करतो आहोत. हे त्यांना कालांतरानं समजेल की आपण काय घोडचुका केल्यात.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.