

राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. भाजपकडून ठिकाठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना- मनसेने युती केली आहे. ठाकरे बंधूंनी युती केली असली तरी देखील त्यांनी प्रचारासाठी सभा घेणं टाळलं ते शाखांना भेट देऊन जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत. प्रचारासाठी ठाकरेंनी सभा घेणं आणि घराबाहेर जाणं का टाळले? यामागचे कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले.
प्रचारासाठी घराबाहेर का पडले नाही यामागचे कारण सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'पालिकेच्या याआधी झालेल्या निवडणुका या खूप स्थानिक स्तरावरच्या असतात आणि त्या असालाच पाहिजे. तिकडे थोडं लोकांना मोकळीक दिली पाहिजे. तिथे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या सभा लावायला लागल्या तर ते योग्य नाही. त्यांना थोडीशी मोकळीक द्या ना. आपण पंचायतराज म्हणतो. तसं पंचायत होईल असं राज आणू नका तुम्ही. त्यांना मोकळीक आणि मुभा दिली पाहिजे.'
मनसे-शिवसेनेकडून प्रचार कसा केला जात आहे याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, 'कालपर्यंत माझा आवाज बसला होता आज थोडासा आवज सुटला आहे. मी परवा नाशिक, संभाजीनगर आणि ठाण्यामध्ये जाणार आहे. मुंबईमध्ये आमची एक सभा होणार आहे. यामध्ये नाईलाज झाला तो म्हणजे माझ्या आवाजामुळे. मी काहीच बोलू शकत नव्हतो त्यामुळे शाखा भेटी सुरू केल्या. सगळ्या शिवसैनिक आणि मनसेसैनिकांपुढे मी दिलगिरी व्यक्त केली कारण मी बोलू शकत नव्हतो. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आम्ही कामं केली आहेत.'
निवडणुकीत दमदाटी केल्याचा आणि पैसे वाटल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. 'आमचं काहीच नुकसान होत नाही. सत्तेसाठी ऐवढे आक्रमक का होत आहेत तुम्ही?. तुमचे ध्येय धोरण स्पष्ट असले पाहिजे. लोकं मतदान नाही तर त्यांच्या आयुष्यातील ५ वर्षे तुम्हाला दान करत आहेत. त्या ५ वर्षांची विल्हेवाट लावायची की सोनं करायचं हे जनता तुमच्या हातात देते. जेव्हा आम्ही अशी पुस्तिका घेऊन येतो की होय आम्ही केले. असं तुम्ही काही तरी सांगा ना. त्यासाठी माणसं कशाला फोडता, दमदाट्या कशाला करता, पैसे कशाला वाटता. ऐवढं करून पुन्हा वाटतच लावणार आहात तर मग निवडणुका कशाला लढता?', असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून तुमची जबाबदारी नेमकी काय आहे याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आमच्या दोघांची जबाबदारी आहे. आजसुद्धा मी लाचारासारखं भाजपसोबत गेलो असतो. पण मी नाही गेलो. राज माझ्यासोबत आले, पवारसाहेब माझ्यासोबत आले. शेवटी आज संख्येने नेते कमी असले तरी जनता प्रचंड आहे. जनता वाट पाहत आहे की यांना कुणी धडा शिकवणार आहे की नाही. जर ठामपणे उभे राहिले की जनता त्याच्यासोबत जाणार. तो पर्याय जनता शोध आहे. तो पर्याय देण्याचे काम आम्ही करत आहोत. ठिक आहे कालपर्यंत अयशस्वी झालो असू उद्या यशस्वी होऊ.'
भाजपने एमआयएमसोबत युती केली यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, 'भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली त्याचे काय झाले. तिकडे कुणासोबत कोण गेले. मग मामू कोण आहे. मामूभाऊ आहे हा महाराष्ट्राचा. ऐवढा निर्लजपणा यांच्यात कसा आला. मुंबईत आम्ही जी कामं केली आहेत. कोस्टलरोड आम्ही केला आहे. तिथे पाटी नाही लावली फक्त मराठी लोकांनी जावे. कोस्टल रोड टोलमुक्त आहे. टोलमुक्त फक्त मराठी भाषिकांसाठी नाही तर सर्वांसाठी आहे. मुस्लिम यांच्यासाठी वेगळा नाही आहे. कोरोनात मराठी- मुस्लिम असं वेगेळे केले नाही. कोरोना काळात साडेसहा लाख उत्तर भारतीय मजदुरांची सोय मी केली होती. त्यांना खाणं आणि राहण्याची सोय दिली होती.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.