Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम

75 day block at Bandra Terminus: पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनसवर ७५ दिवसांचा ब्लाक घेण्यात येणार आहे. हा ब्लाक १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम
Mumbai LocalSaam Tv
Published On: 

वांद्रे टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ च्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी पश्चिम रेल्वेकडून तब्बल ७५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर २०२६ पासून या कामाला सुरुवात होणार आहे. हा ब्लॉक २३ फेब्रुवारी २०२७ पर्यंत म्हणजेच ७५ दिवसांचा असणार आहे. या कालावधीत दररोज ४ उपनगरी लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे चर्चगेट-बोरिवली मार्गावरील प्रवाशांना फटका बसणार आहे.

याशिवाय १५ लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या सुटण्याच्या आणि आगमन स्थानकात बदल करण्यात आले आहेत. काही गाड्या दादर, तर काही बोरिवली स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरुण कुमार मीणा यांनी सांगितले की, ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय टालण्यासाठी वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यानुसारच प्रवासांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या आहेत.

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम
Neral Railway Station: ४ सरकते जिने, ५ लिफ्ट अन् ४३७ प्रवाशांसाठी बसण्याची सोय, नेरळ रेल्वे स्थानकाला मिळालं सुवर्ण मानांकन

दुपारनंतर ४ लोकल सेवा रद्द -

चर्चगेट-बोरिवली मार्गावरील ४ लोकलसेवा दुपारच्या वेळेत रद्द राहणार आहे. बोरिवलीहून चर्चगेटकडे जाणारी दुपारी २.४० वाजताची जलद लोकल रद्द करण्यात येणार आहे. त्यासोबतच, बोरिवलीहून दुपारी ३.४० वाजताची सुतरपाडा चर्चगेट धीमी लोकल, चर्चगेटहून सायंकाळी ५.२८ वाजताची सुतरपाडा बोरिवली वातानुकूलित जलद लोकल, बोरिवलीहून सायंकाळी ६.२४ वाजताची सुतरपाडा चर्चगेट वातानुकूलित जलद लोकल रद्द करण्यात आली आहे. या सेवा १ डिसेंबर २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत रद्द राहतील.

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम
Western Railway : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांची लोकल वांद्र्यापर्यंत धावणार; काम अंतिम टप्प्यात

३ गाड्या दादरऐवजी वांद्रे टर्मिनसवर थांबतील -

- भुज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (२२९५६)

- भुज-दादर टर्मिनस एक्स्प्रेस (२२९५६)

- अजमेर-वांद्रे सुपरफास्ट एक्स्प्रेस (१२९१०)

- श्रीगंगानगर-दादर एक्स्प्रेस (१२९५८)

- भगत की कोठी-दादर एक्स्प्रेस (२०८४४)

५ गाड्या वांद्रे टर्मिनसऐवजी बोरिवलीतच थांबणार -

- भुज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (२२९०४)

- उदयपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (१९०१६)

- मडगाव-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (१०११५)

- जयपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (१२९२३)

- जोधपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस (१२९५१)

Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष असू द्या! वांद्रे टर्मिनसवर १ डिसेंबरपासून ७५ दिवसांचा ब्लॉक; लोकलसेवेवर होणार परिणाम
Railway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.