

संजय गडदे
Mumbai News : सीसीटीव्हीमुळे रेल्वे स्टेशन्सवरील बारीक सारीक हालचाली कॅमेऱ्यात कैद होऊ लागल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्टेशनवरील गुन्ह्याच्या घटना आणि अनेक अपघातही सीसीटीव्हीत कैद होता. अशीच एक रेल्वे स्टेशनवरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अनेकदा रेल्वेचे नियम मोडून चुकीच्या पद्धतीने काही प्रवासी रेल्वे रूळ ओलांडताना आढळून येतात. मात्र योग्य माहिती नसल्याने अनेकांच्या हे कृत्य जीवावर बेतल्याचा पाहायला मिळालं आहे. मुंबई पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकातही असाचा काहीसा प्रकार घडला आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना एक महिला रुळावरून प्लॅटफॉर्मवर चढत असताना अचानक आलेली रेल्वे पाहून पूर्णतः घाबरून गेली. त्यावेळी अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने आपल्या जीवाची परवा न करता त्या महिलेचा जीव वाचवला. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार,अंधेरी रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घोंडीबा दत्तु नवले हे 17 जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजताचे दरम्यान माहीम रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 वरून अंधेरी येथे कर्तव्यावर निघाले होते.
दरम्यान एक महिला रुळ ओलांडून फलाटावर येत होती आणि तेवढ्यात लोकल गाडी आली. नवले यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या महिलेस काही सेकंदात तिचा हात पकडून फलाटावर खेचलं आणि तिचा जीव वाचवला. समोर मृत्यू दिसत असताना आपला जीव धोक्यात घालून त्या प्रवासी महिलेचा जीव वाचवल्यामुळे महिला प्रवाशाने पोलीस कर्मचारी नवले यांचे आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.