

शिरुरकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला पर्यायी मार्ग
जेएनपीटी बंदर ते थेट शिरुर मार्ग होणार
मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शिरुरकरांसाठी नवीन महामार्ग तयार करणार आहे. जुन्या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे. याबाबत शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी माहिती दिली आहे.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वाहतूकीची जास्त वर्दळ असते. आता हा ताण कमी केला जाणार आहे. थेट शिरुरसाठी नवीन महामार्ग सुरु केला जाणार आहे. उरण-कर्जत-नेरळ- वांद्रे, पाईट-शिरोली-पाबळ-मलठण-शिरुर असा रस्ता तयार केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी केली होती. आता या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
पुणे-मुंबई एक्सप्रेसवेला पर्यायी मार्ग तयार केला जाणार आहे. ‘नेरळ-कर्जत-वांद्रे-पाईट-मलठण-शिरूर’ या नवीन पर्यायी मार्गाला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
या नवीन पर्यायी मार्गामुळे चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी कायमची फुटणार आहे. पुणे ते शिरूर दरम्यान ५३ किमीचा देशातील सर्वात लांब १०-पदरी ‘मल्टी-लेयर’ उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे.हा रस्ता थेट जेएनपीटी बंदराला जोडला जाणार आहे. मुंबई, जेएनपीटी बंदर थेट शिरूरशी जोडले गेल्याने व्यापार आणि रोजगाराला नवी गती मिळणार आहे,
या ठिकाणांना होणार फायदा
या नवीन पर्यायी महामार्गामुळे मुंबई- पुणे, शिरुर, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. याचसोबत तळेगाव-चाकण आणि शिक्रापूर या रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.