दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करताय? मिसिंग लिंकच्या दोन मार्गिका बंद; दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांची गैरसोय

Mumbai-Pune Expressway Missing Link : दिवाळीत मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकला जोडणाऱ्या खोपोली परिसरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत.
Mumbai-Pune Expressway Missing Link
Long queues of vehicles stuck on the Mumbai-Pune Expressway amid heavy congestion near Lonavala ghat.saam tv
Published On: 

दिलीप कांबळे, मावळ :

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (Expressway) 'मिसिंग लिंक'ला जोडणाऱ्या खोपोली परिसरातील १०० मीटर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ऐन दिवाळीच्या काळात हाती घेतले आहे. या पाचपदरी रस्त्यापैकी दोन मार्गिका बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे.

दुरुस्तीसाठी विशेष डांबराचा वापर

एमएसआरडीसीच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाचपदरी रस्त्यापैकी दोन मार्गिकांच्या दुरुस्तीचे काम ३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी विशेष 'इपॉक्सी डांबरा'चा (Epoxy Asphalt) वापर केला जात आहे. दोन मार्गिकांचे काम सुरू असल्याने मिसिंग लिंककडे जाण्यासाठी सध्या तीनच मार्गिका उपलब्ध आहेत.

Mumbai-Pune Expressway Missing Link
आंबा प्रेमींसाठी खूशखबर, पुण्याच्या बाजारात आंबा हंगामाचा शुभारंभ, पेटीला 41 हजारांचा भाव

वाहतूक कोंडीचा दावा अधिकाऱ्यांनी फेटाळला

दोन मार्गिका बंद असल्याने वाहतुकीचा वेग मंदावून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी वाहतुकीची कोणतीही मोठी अडचण येत नसल्याचा दावा केला असून, सध्या उपलब्ध असलेल्या तीन मार्गिका वाहतुकीसाठी पुरेशा असल्याचे सांगितले आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link
वसईतील न्यायाधीशाचा सांगलीत मृत्यू; दिवाळीच्या सुट्टीत गावी गेल्यानंतर दुर्घटना

दिवाळीनंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार

सध्या बंद असलेल्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित तीन मार्गिकांची दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे. हे संपूर्ण काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना या दुरुस्तीमुळे मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.