दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी आलेल्या वसई येथील न्यायाधीशाचा विजेचा तीव्र धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तुकाराम उर्फ अजित पतंगराव मोटे (वय ४३) असे मृत न्यायाधीशाचे नाव आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे मोटे कुटुंबासह संपूर्ण देशिंग गावावर आणि न्यायालयीन वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम मोटे हे पालघर जिल्ह्यातील वसई येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने ते सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील आपल्या मूळ गावी आले होते. रविवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी असलेल्या उसाच्या शेताला अचानक आग लागल्याचे समोर आले.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे, हे पाहण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी न्यायाधीश तुकाराम मोटे शेताकडे गेले. मात्र, शेतात ११ केव्हीची मुख्य वीज वाहिनी (हाय व्होल्टेज वायर) तुटून जमिनीवर पडलेली होती. शेतात चालताना त्यांचा पाय या जिवंत विजेच्या तारेवर पडला. विजेचा प्रचंड तीव्र झटका बसल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
पोलीस ठाण्यात नोंद
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत. एका कर्तव्यदक्ष न्यायाधीशाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.