मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ बैल मारला? तर्क-वितर्कांना उधाण, व्हिडिओ व्हायरल

Mumbai-Pune Expressway ‘Missing Link’: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये बोगद्याजवळ एका बैलाला मारल्याचा दावा करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप या तपशिलाला दुजोरा दिलेला नाही.
Mumbai-Pune Expressway ‘Missing Link’
Workers clean a site near the ‘Missing Link’ tunnel on Mumbai-Pune Expressway as a viral video fuels controversy.saam tv
Published On
Summary
  • ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून नवा वाद

  • व्हायरल व्हिडिओमुळे बैल मारल्याचा दावा

  • अधिकृत पुष्टी अद्याप नाही

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच या मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासाचे ३० मिनिटे वाचणार आहे. त्याच दरम्यान मिसिंग लिंक बाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

Mumbai-Pune Expressway ‘Missing Link’
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांनी द्रुतगती महामार्गावरील प्रवाशांची मागितली माफी

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या बोकद्याजवळ बैल मारल्याचा दावा केला जातोय. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील 'मिसिंग लिंक'चे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. सहा किलोमीटरच्या मार्गात बोगदा, पूलही आहे. याच बोगद्याजवळ बैल मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रक्त सांडलेलं आहे. ते आता धुण्यात येत आहे. त्याबाबत कामगारांना विचारणा केल्यानंतर तेथील कामगारांनी बोलण्यास नकार दिला आहे.

Mumbai-Pune Expressway ‘Missing Link’
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं नाव बदलणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण

हे कामगार रक्ताचे डाग धुऊन काढत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचा हा सगळा प्रकार घडल्याचं या ठिकाणी समोर आले आहे.कामगारांनी बैल मारला असल्याच सांगितलं जातंय. बैल मारल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. याप्रकरणी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांना विचारण्या करण्यात आली आहे. बोगद्याच्या जवळ बैल मारल्याच्या गोष्टीची आपल्याला कल्पना नाहीये. दरम्यान कामगार रक्ताचे डाग साफ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मिसिंग वेचा पहिला बोगदा जेथे सुरू होतो, तेथे बैल मारल्याचा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. एमएसआरडीसीच्या कर्मचाऱ्यांनी याची कोणतीच कल्पना नसल्याचं म्हटलंय. परंतु रस्ता साफ करताना रक्ताचे डाग दिसत आहेत. यासर्व प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ एक्सप्रेसवेला 'मिंसिग' नाव का पडलं?

'मिसिंग लिंक' हा केवळ टेकनिकल शब्द नाहीये तर तो अनेक वर्षे अस्तित्वात नसलेल्या एका अपूर्ण भागाला म्हटलं जातं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला नियंत्रित-एक्सेस द्रुतगती मार्ग आहे. परंतु रस्ता पूर्ण होऊनही प्रवाशांना जुन्या, वळणदार आणि धोकादायक घाटमार्गावरूनच प्रवास करावा लागत होता. ही मिसिंग गोष्ट एक महत्त्वाची लिंक ठरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com