Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं नाव बदलणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण

mumbai pune missing link name change devendra fadnavis : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक आजपासून (१ मे २०२६) वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र, या मिसिंग लिंकचं नाव बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. नाव बदलण्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे नाव बदलणार, फडणवीसांनी सांगितलं कारण
Missing Link On Mumbai Pune Express waysaam tv
Published On

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर लगेचच या मार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. यामुळं प्रवासाचा वेळ वाचणार आहे. याशिवाय वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. मात्र, लवकरच या मिसिंग लिंक रस्त्याचे नाव बदलण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः नाव बदलण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले.

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवासासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. जवळपास अर्ध्या तासाची बचत होणार आहे. तसेच तासनतास वाहतूक कोंडीत अडणाऱ्या प्रवाशांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. हा मिसिंग लिंक आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील 'मिसिंग लिंक'चे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. सहा किलोमीटरच्या मार्गात बोगदा, पूलही आहे. त्यामुळे अर्धा तास वेळही वाचणार आहे. या मार्गाचं मुख्य आकर्षण म्हणजे १३३ मीटर उंचावर पूल आहे.. या पुलाचा आकार विमानासारखा आहे. दरीतील वेगवान वाऱ्यांचा दाब सहन करण्यासाठी हे विशेष डिझाइन तयार करण्यात आले आहे. याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हणा आणि याचं नावही बदलणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई - पुणे मिसिंग लिंकचे नाव बदलणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटले पाहिजे. ज्यावेळी ही तयार केली त्यावेळी काही लिंक नव्हती. म्हणून मिसिंग लिंक म्हणत होतो. कनेक्टिंग लिंक असे म्हणायला हवे. मिसिंग आता काहीच नाही. लवकरच सगळे मिळून याला नाव काय द्यायचे हे ठरवणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com