Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघाताचा थरार, एकमेकांना धडक देत २ वाहने दरीत कोसळली

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनरने टेम्पोला धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनं दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला.
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway Accident NewsSaam Tv
Published On: 
  • मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनरची टेम्पोला धडक

  • मुंबई लेनवर दोन वाहनांचा भीषण अपघात

  • बोरघाटात दोन वाहने दरीत कोसळली

  • कंटेनर चालकाचा अपघातात जागीच मृत्यू

दिलीप कांबळे, मावळ

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनं अनियंत्रित होत दरीत कोसळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील मुंबई लेनवर खोपोली हद्दीत हा अपघात झाला. या अपघाताचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा बोरघाट आज दोन वाहनांचा विचित्र आणि भीषण अपघात झाला. मुंबई लेनवरील किलोमीटर क्रमांक 39 च्या दरम्यान मालवाहू कंटेनरने मागून टेम्पोला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडकेनंतर दोन्ही वाहने नियंत्रणाबाहेर जाऊन बोरघाटातील दरीत कोसळली. या अपघातात कंटेनर खोल दरीत कोसळला यात कंटेनर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. मृत चालकाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

Mumbai-Pune Expressway
BJP MLA Accident: भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

या अपघातात टेम्पोचा चालक मिराज शेख हा सुखरूप बचावला. अपघातामध्ये तो जखी झाला आहे. टेम्पो वरतीच अडकल्यामुळे त्याचा चालकाचा जीव वाचला. हा अपघात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर घडला. अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, अ‍ॅफकॉन्स कंपनीची टीम, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि 108 रुग्णवाहिका, हेल्प फाऊंडेशनचे सदस्य तसेच बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Mumbai-Pune Expressway
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

दोन्ही वाहने दरीत कोसळल्याने बचावकार्याला आव्हान निर्माण झाले. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून द्रुतगती मार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नसल्याची माहिती आहे. या अपघातामागील नेमके कारण आणि पुढील तपास महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे. जखमी टेम्पो चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Mumbai-Pune Expressway
Accident : अंत्यविधीला जाताना कार अन् ट्रकची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; अपघाताने एका क्षणात सर्व काही संपलं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com