Mumbai pUne express way
Mumbai pUne express way Saam Tv

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प; शेकडो गाड्यांची भलीमोठी रांग, पाहा VIDEO

Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान कुनेगाव येथे भीषण अपघात झाला.
Published on

Mumbai Pune Express Way : मुंबई-पुणे महामार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा ते खंडाळा दरम्यान कुनेगाव येथे एक भीषण अपघात झाल्याने रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरने अपघातानंतर पेट घेतला. अपघातानंतर टँकर रस्त्यावर पलटला अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याने मोठा स्फोट होऊन टँकरला भीषण आग लागली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  (Latest Marath News)

Mumbai pUne express way
Khandala Fire News: मोठी बातमी! खंडाळा घाटात टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू , 3 जखमी

दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू

दरम्यान टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले. यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली. या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दोन जाणं जखमी झाले आहे. (Accident)

Mumbai pUne express way
Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघातातील 81 जणांचे मृतदेह बेवारस, होणार सामूहिक अंत्यसंस्कार?

घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर जवळपास तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आली आहे. टँकरी रस्त्यातून हटवण्यात आला आहे. वाहतूर पूर्वपदावर येण्यास आणखी काही वेळ लागेल, असं वाहतूक पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com