Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघातातील 81 जणांचे मृतदेह बेवारस, होणार सामूहिक अंत्यसंस्कार?

Bhuvaneswar Latest News: या रेल्वे अपघातामध्ये (Odisha Train Accident) 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.
Odisha Train Accident News
Odisha Train Accident NewsSaam TV
Published On

Odisha News: ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये (Odisha Train Accident) 288 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 1100 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह अशा अवस्थेत होते की त्यांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. 288 मृतांपैकी 193 जणांचे मृतदेह भूवनेश्वरला (Bhuvaneswar) पाठवण्यात आले होते. यामधील 110 मृतदेहांची ओळख पटली असून ते त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहेत. तर या रेल्वे अपघातामध्ये 81 जणांचे मृतदेह बेवारस आहेत.

Odisha Train Accident News
Cabinet Decision : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 1500 कोटींच्या निधीला मंजुरी; ग्रामसेवक आणि विद्यार्थ्यांसाठीही खूशखबर

रेल्वे अपघात होऊन 11 दिवस झाले आहेत. आता हे बेवारस मृतदेह सडू लागले आहेत. अशामध्ये आता या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे. या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरकारी आदेशांची प्रतीक्षा आहे. भुवनेश्वरमध्ये अशी जागा शोधली जात आहे ज्याठिकाणी या सर्व बेवारस मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले जातील.

Odisha Train Accident News
Khandala Fire News: मोठी बातमी! खंडाळा घाटात टँकरला भीषण आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू , 3 जखमी

AIIMS भुवनेश्वर येथे चार विशेष मागणी केलेल्या कंटेनरमध्ये ठेवलेल्या बेवारस मृतदेह, अवयव आणि इतर शरीराच्या अवयवांशी जुळण्यासाठी आतापर्यंत 75 डीएनए नमुने दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक दिलीप कुमार परिदा म्हणाले की, मृतदेह कुजण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. परंतु डीएनए चाचणीच्या निकालानंतर लगेच आवश्यक पाऊल उचलले जातील.

Odisha Train Accident News
Online Shopping Fraud: लोन घेऊन महागडा मोबाइल ऑनलाइन मागवला; बॉक्स उघडताच बसला ४४० व्होल्टचा झटका

डॉ डीके परिदा यांनी पुढे सांगितले की, 'सामान्यतः घटनेच्या 72 तासांच्या आत मृतदेहांवर दावा केला पाहिजे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही संरक्षण देणे सुरू ठेवले आहे. डीएनए विश्लेषण अहवाल आणि त्यावर सरकारच्या निर्णयाची आम्ही वाट पाहणार आहोत. त्याचवेळी दावेदारांची संख्या पाहता सरकारही बुचकळ्यात पडले आहे. अपघातग्रस्तांचे 81 मृतदेह बेवारस आहेत. 75 जणांनी आतापर्यंत दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com