Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल नागरिकांना केला परत
Mumbai Police NewsSaam Tv

Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल नागरिकांना केला परत

Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या परिमंडळ १० कडून चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांतील तब्बल २ कोटी ९० लाख ९४ हजार रुपयांचा जप्त मुद्देमाल ४९० तक्रारदारांना परत करण्यात आला.
Published on
Summary
  • मुंबई पोलिसांकडून २.९० कोटींचा जप्त मुद्देमाल ४९० तक्रारदारांना परत

  • चोरी, घरफोडी, फसवणूक व सायबर गुन्ह्यांतील मालमत्ता सुपूर्द

  • सेव्हन हिल हॉस्पिटल, अंधेरी येथे कार्यक्रम पार पडला

  • मुंबई पोलिसांच्या तत्पर आणि पारदर्शक कारवाईचे कौतुक

संजय गडदे, मुंबई

मुंबई पोलिसांच्या कामगिरीची पोचपावती देणारी बातमी समोर आली आहे. परिमंडळ १० अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल २ कोटी ९० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल ४९० तक्रारदारांना परत करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हा हस्तांतरण कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ऑडिटोरियम हॉल, सेव्हन हिल हॉस्पिटल, मरोल-मरोशी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे पार पडला.

परिमंडळ १० अंतर्गत अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला. चोरी, घरफोडी, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांमधील मालमत्ता परत देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल नागरिकांना केला परत
Rain Alert : हवामानाचा मूड बदलला, पुण्यात पावसाची शक्यता; आज तुमच्या शहरातील तापमान कसं असेल?

परत करण्यात आलेल्या मुद्देमालाचा तपशील

एकूण ४९० प्रकरणांमधील मुद्देमाल तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आला. त्यामध्ये सोने-चांदी व हिरे दागिने – ३५१.५ ग्रॅम सोने, १३ किलो ७७० ग्रॅम चांदी व ०.६० कॅरेटचे २७ हिरे (एकूण किंमत सुमारे ₹९९,०३,०००)

रोख रक्कम – ₹४२,७६,०००

दुचाकी वाहने – ९ (₹४,९५,०००)

तीनचाकी वाहने – ११ (₹१०,२०,०००)

चारचाकी वाहन – १ (₹४,००,०००)

मोबाईल फोन – ४४२ (₹१,१६,००,०००)

सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम – ₹१२,५०,०००

इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू – ₹१,५०,०००

एकूण मुद्देमालाची किंमत – ₹२,९०,९४,०००

Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल नागरिकांना केला परत
Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...

दीर्घ प्रतीक्षेनंतर स्वतःचा मुद्देमाल परत मिळाल्याने ४९० तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या तत्पर कारवाईचे व पारदर्शक कामकाजाचे कौतुक करत आभार मानले. “मुंबई पोलीस नेहमीच कर्तव्यदक्षतेने काम करतात,” अशा शब्दांत नागरिकांनी भावना व्यक्त केल्या. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) परमजीत सिंह दहिया, पोलीस उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Mumbai Police : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, २ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल नागरिकांना केला परत
Mulund Metro : मुंबईत मोठी दुर्घटना! मेट्रो पिलर स्लॅब थेट ऑटो अन् कारवर कोसळला, मलब्याखाली अनेकजण अडकले, एकाचा मृत्यू

तसेच अंधेरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतराव पाटील, साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मौर्य आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून जप्त केलेला मुद्देमाल अल्पावधीत तक्रारदारांना परत देणे ही मुंबई पोलिसांची जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी कारवाई ठरली आहे. परिमंडळ १० च्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com