मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार; असा आहे राज्य सरकारचा 'पाताल लोक' प्लान

Mumbai 31 km Integrated Tunnel Project Latest Update: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने ३१ किलोमीटरच्या एकात्मिक पाताल लोक बोगदा प्रणालीचा आराखडा सादर केला आहे. बीकेसी, विमानतळ आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडले जाणार असून उत्तन ते विरार मार्गाचाही सुधारित आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडण्यात आला.
PatalLokProject
PatalLokProjectsaam tv
Published On: 

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास वेगवान आणि अखंड करण्यासाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूपासून ते वांद्रे-कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली तसेच मुंबई ते वाढवण जोडणी प्रस्थापित करण्यासाठी भाईंदर/उत्तन ते विरार या मार्गाचा सुधारित आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सादर केला.

PatalLokProject
Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! पश्चिम द्रुतगती मार्गावर BMW ने महिलेला चिरडलं, जागीच मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक रस्ता बोगदा प्रणाली (पाताल लोक) तसेच मुंबई-वाढवण द्रुतमार्ग जोडणीसंदर्भात वर्षा शासकीय निवासस्थानी बैठक झाली. यावेळी नगर विकास विभागाचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मुंबई प्रदेश महानगर विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी वेलारासू, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक व गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आदि उपस्थित होते.

PatalLokProject
दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार नाही; 'चैत्यभूमी' नाव 'या' स्थानकाला देणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

एमएमआरडीएच्या वतीने सादर करण्यात आलेल्या एकात्मिक रस्ता बोगदा प्रणालीचा एका दिशेचा मार्ग सुमारे ३१ किलोमीटरचा असून या प्रकल्पामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग यांना प्रवेश व निर्गमन मार्गांद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह बीकेसी व विमानतळाला थेट जोडणी मिळणार आहे.

PatalLokProject
दादर रेल्वे स्थानकाचे नामकरण होणार नाही; 'चैत्यभूमी' नाव 'या' स्थानकाला देणार, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई-वाढवण द्रुतगतीमार्ग जोडणीच्या भाईंदर/उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. यासंदर्भात या मार्गाच्या आरेखनाच्या दोन पर्यायांवर चर्चा करण्यात आली.या प्रस्तावित मार्गांमुळे मुंबई महानगरप्रदेशातील प्रस्तावित रिंगरोडची जोडणी अधिक सक्षम होणार असून मुंबईतील प्रवास कमीत कमी वेळात होण्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.