

मयूर राणे, साम टीव्ही
मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघे जण धावत्या लोकलमधून पडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेने लोकलमधील प्रवाशांमध्येही एकच खळबळ उडाली.
राज्यासहित मुंबईतही धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईतील विविध भागातील नागरिकांनी धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईतील विविध भागात राजकीय पक्षांनी धुळवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही रहिवासी परिसरातही नागरिकांनी धुळवड साजरी केली. परंतु मुंबईत शांतेत धुळवड साजरी झाली. त्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबईतील खार रेल्वे स्टेशनजवळ दोघे जण धावत्या ट्रेनमधून पडले. दोघे जण लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना ही दुर्दैवी घटना घडली. दोघेही व्यक्ती दारूच्या नशेत होते. या घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. दोघे जण ट्रेनमधून पडल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रेनमधून पडलेल्या दोघांची आणखी माहिती हाती आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.