मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

Mira Road Marathi Language Morcha : सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय जारी केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला. तर हिंदी भाषिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आगीत तेल टाकत मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली.
Mira Road Marathi Language Morcha
Mira Road Marathi Language MorchaSaam Tv News
Published On

मुंबई : ही गर्जना आणि हा एल्गार आहे मराठी भाषिकांचा, अमराठी व्यापाऱ्यांनी मीरा भाईंदरमध्येच मराठी भाषिकांना आव्हान देत मराठीविरोधात गरळ ओकली. आणि यानंतर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मनसेसह मराठी एकीकरण समितीने मोर्चानेच उत्तर द्यायचं ठरवलं. मात्र इथे सुरु झाला नाट्यमय घडामोडींचा अंक. पोलिसांनी मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली. तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावत धरपकडही केली. याच मराठीच्या मुस्काटदाबीवरुन मनसे नेते संदीप देशपांडेंनी सरकारवर आगपाखड केलीय. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र मनसेच्या हट्टीपणामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय जारी केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी वाद पेटला. तर हिंदी भाषिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांनी आगीत तेल टाकत मराठी बोलणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद आणखीच टोकाला गेला. तर मिरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्याने मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसेने त्याचा गाल रंगवला. त्यानंतरच्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर मोर्चाआधीच पोलिसांनी मराठी भाषिकांची धरपकड केली.

Mira Road Marathi Language Morcha
Crime News : जिहादी छांगूर बाबा; हिंदू मुलींचं धर्मांतर, छांगूर बाबांकडून हिंदू मुली टार्गेट; बाबाचे कारनामे काय?

हा मोर्चा मनसेने पुकारला होता. मात्र या मोर्चात मिरा भाईंदरमधील सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे यातून ही गोष्ट स्पष्ट झालीय की मराठी अस्मितेचा मुद्दा हा राजकारणाच्या पलिकडचा आहे.

Mira Road Marathi Language Morcha
Mumbai Local : 'ऑफिसच्या वेळा बदला' 800 कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंतीपत्र, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेची धडपड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com