पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

Mira Road Attack Ansari Isis Radicalization Case: मुंबई पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती झालीय...ISISचा लोन वुल्फ हल्ला नेमका काय आहे? धर्म विचारून चाकू हल्ला करणारा तो जिहादी नेमका कोण आहे? मुंबईतील एका हल्लेखोराचा ISISशी कसा संबंध आहे?
Security tightened in Mira Road after a suspected lone wolf terror attack linked to ISIS left two guards injured.
Security tightened in Mira Road after a suspected lone wolf terror attack linked to ISIS left two guards injured.saam tv
Published On

कलमा पढा क्या... असं विचारत मिरारोड मध्ये एका जिहादीनं पहलगाम हल्ल्यासारखाच भ्याड हल्ला भर सकाळी सकाळी करुन दोघांना जखमी केलंय. मिरारोडच्या नयानगरमधील वॉकहार्ट रुग्णालयाच्या मागे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आरोपी जुबैर अन्सारी आला, त्यानं तिथं असलेल्या २ सुरक्षारक्षकांना कलमा वाचता येतो का? नमाज पढता येतो का? असा सवाल केला. गोंधळून गेलेल्या या सुरक्षारक्षकांनी नाही म्हटल्यावर या जिहादीनं थेट चाकू काढून सपासप वार करायला सुरुवात केली. यावेळी सुरक्षारक्षक बचाव बचाव म्हणत वाचवण्यासाठी सगळ्यांना हाका मारत होता परंतू या हल्लेखोराला दया आली नाही तो त्याच्या मागे पळू लागला आणि पु्न्हा त्याच्यावर हल्ला केला. त्याचवेळी दुसरा सुरक्षारक्षक हा हल्ला पाहून जीव वाचवण्यासाठी केबिनच्या दिशेनं पळाला पण हल्लेखोरानं केबिनमध्ये घुसून त्याच्यावर वार करत त्यालाही रक्तबंबाळ करत आपलं मिशन पुर्ण केलंय. ..

घडल्या घटनेनंतर पोलिसांनी अँक्शनमोड मध्ये हल्लेखोराच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर या सगळा प्रकार लोन वुल्फ हल्ल्याचा असल्याचं समोर आलंय. आता लोन वुल्फ म्हणजे काय पाहा, लोन वुल्फ हल्ला करणारा हल्लेखोर कोणत्याही संघटनेचा अधिकृत सदस्य नसतो, तो एकटाच असतो, इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे कट्टर विचारांकडे आकर्षित होऊन तो असे हल्ले करतो अनेकदा हल्लेखोरांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचं समोर आलंय. हा हल्ला करताना हल्लेखोर चाकू, गाडीसारख्या साधनांचा सहज वापर करतो आणि हल्ल्याचं सोशल मीडियावर लाईव्हही करतो.

आता या संपुर्ण प्रकरणाचा तपास एटीएस कडे सोपवण्यात आल्यानंतर जी माहिती समोर आली त्यानं तर धडकीच भरलीये. कारण सर्व सामान्य नागरिकांच्या वेशातला हा आरोपी अंन्सारी दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलंय. त्याचा थेट ISIS शी कनेक्ट असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीये.

हल्लेखोर अन्सारीचं ISIS कनेक्शन

अन्सारीच्या घरात हस्तलिखित नोट्स, लॅपटॉप सापडला

ISIS दहशतवादी संघटनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त

आरोपी अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर

अनेक वर्षे अमेरिकेत राहिला, नोकरी न मिळाल्याने भारतात आला

मीरा रोडमध्ये एकटाच राहून केमिस्ट्रीचे ऑनलाईन कोचिंग द्यायचा

इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरपंथी बनल्याचा संशय

अन्सारीच्या घरात हस्तलिखित नोट्स, लॅपटॉप सापडला त्यामधील नोंदीनुसार त्याची ISIS या दहशतवादी संघटनेत सामील होण्याची इच्छा होती. आरोपी अन्सारी हा आरोपी अन्सारी हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून तो अनेक वर्षे अमेरिकेत राहिलाय, त्याला परदेशात नोकरी न मिळाल्याने तो भारतात आला आणि मीरा रोडमध्ये एकटाच राहून केमिस्ट्रीचे ऑनलाईन कोचिंग देण्याच काम करत होता. यावेळी तो इंटरनेटच्या माध्यमातून कट्टरपंथी बनल्याचा संशय असून तसा तपास सुरु झालाय.

पहलगाम हल्ल्याला नुकतेच वर्ष पुर्ण झालंय. आणि आता मुंबईच्या अगदी शेजारील मिरारोडमध्ये घडलेल्या घटनेनं तपास यंत्रणांसोबतच सगळ्यांची झोप उडालीये. सीमापार बसून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या देशात जिहादची फॅक्टरी सुरु करणाऱ्या या दहशतवाद्यांच्या मुळ आकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलीये. लोन वुल्फ हल्ल्यानंतर आता प्रत्येकालाच सावध राहण्याची आणि सतर्क राहण्याची ही नितांत गरजये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com