Mumbai Mhada: म्हाडाचं घर, सामान्यांना घरघर! फ्लॅटची किंमत तब्बल 7.50 कोटी; सर्वात स्वस्त घराची किंमत किती?

Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.
म्हाडाचं घर, सामान्यांना घरघर! फ्लॅटची किंमत तब्बल 7.50 कोटी; सर्वात स्वस्त घराची किंमत किती?
म्हाडाचं घर, सामान्यांना घरघर! फ्लॅटची किंमत तब्बल 7.50 कोटी; सर्वात स्वस्त घराची किंमत किती?Saam Digital
Published On

एकेकाळी म्हाडाचं घर सर्वसामान्यांसाठी आधार होतं. मायानगरीत स्वत:चं घर असावं असं स्वप्न बाळगणा-यांची स्वप्नपूर्ती म्हाडानं केली आहे. मात्र आता स्थिती बदलली आहे.

म्हाडाची घर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहीली नाहीत. हे वास्तव आहे. कारण म्हाडानं जाहीरात काढलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. तब्बल 30 लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत किंमत आहेत. ताडदेवमधील उच्च गटासाठीच्या घराची किंमत सर्वाधिक म्हणजे साडेसात कोटींवर आहे.

म्हाडाचं घर, सामान्यांना घरघर! फ्लॅटची किंमत तब्बल 7.50 कोटी; सर्वात स्वस्त घराची किंमत किती?
Maharashtra Politics : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा मुंबईकडे मोर्चा; ठाण्यात आज ठाकरे गटाचा मेळावा, तर कॉंग्रेसची मुंबई जोडो यात्रा

या लॉटरीअंतर्गत गोरेगाव, मालाड, जुहू, अॅन्टॉप हिल, पवई, कन्नमवार नगर, ताडदेव अशा विविध ठिकाणी घर उपलब्ध होणार आहेत. 2,030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. अर्ज नोंदणीला सुरुवातही झाली आहे. 13 सप्टेंबरला सोडत निघणार आहे.

कोणत्या उत्पन्न गटासाठी किती किमतीचे घरं?

स्थळ उत्पन्न गट किंमत

अॅन्टॉप हिल अत्यल्प गट 51 लाख 41 हजार

विक्रोळी अल्प गट 67 लाख 13 हजार

मालाड अल्प गट 70 लाख 87 हजार

गोरेगाव मध्यम गट 1 कोटी 11 लाख 94 हजार

पवई मध्यम गट 1 कोटी 20 लाख 13 हजार

पवई उच्च गट 1 कोटी 78 लाख 71 हजार

ताडदेव उच्च गट 7 कोटी 52 लाख 61 हजार

म्हाडाचं घर, सामान्यांना घरघर! फ्लॅटची किंमत तब्बल 7.50 कोटी; सर्वात स्वस्त घराची किंमत किती?
Mumbai Political News : मुंबईवर 'राज' कुणाचं? उद्धव ठाकरे की ठाकरेंचेच! ठाण्याचे शिंदे बाजी मारतील का?

म्हाडाच्या घरांच्या या किंमती पाहून तुमचे डोळे विस्फारले असतील. अव्वाच्या सव्वा किंमतीमुळे यंदा किती अर्ज येतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com