
मुंबईतील लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अंबरनाथ - बदलापूर या परिसरातूनही मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त दररोज मुंबईला ये-जा करतात. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि रेटारेटीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
अंबरनाथ -बदलापूर लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक दिलासा देणार बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार होणार असून मुंबईची मेट्रो आता थेट अंबरनाथ- बदलापूरपर्यंत धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते तिसरी मुंबईचा प्रवास आता सुसाट होणार आहे. अंबरनाथ-बदलापूर या परिसरातूनही मोठ्या संख्येने नागरिक कामानिमित्त दररोज मुंबईला ये-जा करतात.
या परिसरातील नागरिक लोकल ट्रेनने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. त्यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी आणि रेटारेटीपासून त्यांची मुक्तता होणार आहे. दरम्यान कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आलीय. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.
सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. या मेट्रो 14 मार्गाचे काम एमएमआरडीए करणार आहे.
कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर मेट्रो 14 धावणार आहे.
हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे.
कांजूरमार्ग ते बदलापूर मार्गात 15 स्थानके असणार आहेत.
मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असेल.
घणसोलीपर्यंत हा मार्ग भूमिगत असेल. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावेल.
घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असेल.
या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग असेल. पारसिक हिल येथून जाणार आहे.
कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.