..तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल, परप्रांतियांचा मुंबईवर डोळा

North Indian leader Sunil Shukla : सुनील शुक्ला यांच्या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मराठी मतं विभागली आहेत, तर उत्तर भारतीय एकत्र आल्यास महापौर बनू शकतो, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
sunil shukla statement on north indian mayor in mumbai
"Sunil Shukla addresses media, stating North Indians can elect Mumbai’s mayor if united – sparking outrage across Marathi political fronts."Saam TV Marathi
Published On

sunil shukla statement on north indian mayor in mumbai : मुंबईमधील मराठी माणूस विभागाला गेला आहे. तर सर्व उत्तर भारतीय लोक एकत्र आल्यास मुंबईमध्ये महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य सुनील शुक्ला यांनी केले आहे. सुनील शुक्ला यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळं संतापाची लाट पसरली आहे. एकीकडे मराठीसाठी राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शुक्ला यांनी मुंबईच्या महापौराबाबत केलेल्या दाव्याने मुंबईमधील राजकारण फिरले आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय बनू शकतो, असं वक्तव्य उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी शुक्रवारी केलंय. मुंबईची लोकसंख्या 2 कोटी 10 लाख आहे. एक कोटी मराठी माणूस आहे, पण मराठी माणूस चार पक्षात विभागाला गेला आहे. मुंबईमध्ये 1 कोटी उत्तर भारतीय आहेत. 10 पैकी केवळ तीन उत्तर भारतीयांनी जरी मतदान केलं तरी 30 लाख मतदान होतं. यामुळे उत्तर भारतीय विकास सेनेचा महापौर होऊ शकतो असं सुनील शुक्ला म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

sunil shukla statement on north indian mayor in mumbai
Weather Update : मुंबईमध्ये 'मुसळधारे'चा इशारा, कोकणातही कोसळधारा, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय समाज एकजुटीने मतदान केल्यास मुंबईत त्यांचा महापौर होऊ शकतो, असा दावा उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते सुनील शुक्ला यांनी केला आहे. मुंबई, ही देशाची आर्थिक राजधानी असून, येथील पालिकेचे ५५ हजार कोटींचे बजेट आहे. मुंबईची लोकसंख्या २ कोटी २० लाख असून, त्यापैकी १ कोटी उत्तर भारतीय, १ कोटी मराठी आणि २० लाख इतर समाजाचे आहेत. शुक्ला यांच्यानुसार, मराठी समाज उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, भाजप आणि काँग्रेस अशा पाच राजकीय पक्षांमध्ये विभागला आहे. यामुळे त्यांची मते २०-२० टक्क्यांपर्यंत विखुरली जाऊ शकतात.

sunil shukla statement on north indian mayor in mumbai
संपत्तीसाठी मुलींनी अपमान केला, फौजी थेट मंदिरात गेला अन् ४ कोटी दान केले

शुक्ला यांनी उत्तर भारतीयांना एकजुटीचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “उत्तर भारतीय इथे पीडित आणि वंचित आहेत. त्यांना मारलं जात आहे. उत्तर भारतीय विकास सेना २२७ जागांवर उमेदवार उभे करेल आणि जिंकेल. एकत्र आल्यास १० पैकी ३ मते मिळवून उत्तर भारतीय महापौर निवडू शकतात.”

sunil shukla statement on north indian mayor in mumbai
फ्रान्सच्या महिलेवर बलात्कार प्रकरणी पुष्पराजला बेड्या, बॉलिवूड कनेक्शन निघाले, सलमान-अक्षयसोबत केलेय काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com