Mumbai News: लग्नात फुकटचं जेवण पडलं महागात; आधी पाहुण्यांनी धू-धू धुतलं, नंतर स्कूटर गमावून बसला

Mumbai News Today: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv
Published On: 

संजय गडदे

Mumbai Viral News: बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचाच प्रत्यय मुंबईत आला आहे. अनोळखी लग्नात जेवण करण्यासाठी जाण काही तरुणाच्या चांगलच अंगाशी आलं आहे. आधी या तरुणाला लग्नातील पाहुण्यांनी धू-धू धुतलं. त्यानंतर आपला जीव वाचवत तो पळून आला मात्र त्यानंतर त्यःची स्कूटी तिथून चोरीला गेली होती. (Latest Marathi News)

Mumbai News
Satara Politics: प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ कृती म्हणजे ढोंगीपणा; उदयनराजेंची खोचक टीका

ही घटना 13 जून रोजी गोरेगाव येथे घडली. जावेद कुरेशी त्याच्या 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसह बाहेर गेला होता. जेव्हा ते जोगेश्वरीला पोहोचले तेव्हा जावेद याने जवळच असलेल्या लग्नात (Marriage) मोफत जेवण करायचे ठरवले. त्यांनी त्या हॉलमध्ये प्रवेश केला.

सर्व तरुणांनी कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. ते मोफत जेवणाचा आस्वाद घेत असताना वर पक्षातील काही लोंकाना त्यांच्यावर संशय आला. ते त्याच्याशी बोलायला आले तेव्हा ते तरुण लग्नात फुकटचे जेवण करायला आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर ही बाब वधू पक्षतील लोंकाना देखील समजली. त्यानंतर या तरुणाला लग्नातील पाहुण्यांनी धू-धू धुतलं. (Mumbai News)

Mumbai News
Narendra Modi America Visit: यूएनमध्‍ये योग, जो बायडन यांच्या सोबत डिनर... असा असेल PM मोदींचा संपूर्ण दौरा

या घटनेबाबत ओशिवरा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "लग्नाच्या ठिकाणी हे तरुण मोफत जेवण घेण्यासाठी आले होते, हे लक्षात येताच पाहुण्यांनी त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हॉलच्या बाहेरच्या रस्त्यावर पोहोचल्यावर पुन्हा काही पाहुण्यांनी त्यांना करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही लोकांनीही हस्तक्षेप करून पाहुण्यांपासून त्या तरुणांचे प्राण वाचवले. कुरेशीने त्यांच्यापैकी एकाला त्याची स्कूटी पार्किंगमधून आणण्याची विनंती केली कारण त्याला पुन्हा घटनास्थळी भेट द्यायची नव्हती.

कुरेशीने विश्वासात घेऊन सुटका करणाऱ्यांपैकी एकाला स्कूटीची चावी दिली. मात्र, कुरेशीने ज्याला स्कूटीची चावी दिली, तो स्कूटीसह फरार झाला.आता कुरेशी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.