Pm Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ४ दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असून त्यानिमित्त संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. ४ दिवसांच्या अमेरिका भेटीदरम्यान प्रधानमंत्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उप राष्ट्राध्यक्ष कमल हारिस तसंच परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहेत. (Latest Marathi News)
या दौऱ्यावर असताना मोदी (Narendra Modi) यांचा व्हाइट हाऊसमध्ये राजकीय सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर जो बायडन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी डीनर देखील करणार आहेत.गेल्या ९ वर्षाच्या कार्यकाळात मोदी यांचा हा ७ वा अमेरिका दौरा आहे. चीनचा वाढत असलेला प्रभाव, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
या दौऱ्यात मोदी अमेरिकेतल्या (America) उद्योजक आणि गुंतवणूकदार कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून भारतीय समुदायालाही भेटणार आहेत. व्यापार, वाणिज्य आणि संरक्षण सामुग्रीविषयक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण वाटाघाटी या दौऱ्यात होणार आहेत. २४ जून रोजी प्रधानमंत्री इजिप्तला जाण्यासाठी अमेरिकेहून रवाना होतील.
असा असेल मोदींचा दौरा -
21 जूनला मोदींच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी नूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र हॅडकोर्टर मध्ये योगा दिवस साजरा करून होणार आहे. यावेळी मोदी काही मोठ्या नेत्यांशीही यावेळी संवाद साधतील. 21 जूनला वॉशिंग्टन डीसीमध्ये स्केलिंग फॉर फ्यूचरवर आधारित कार्यक्रमात सहभागी होतील. याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यात खासगी बैठक होण्याचीही शक्यता आहे. (PM Modi News)
22 जूनला व्हाईट हाऊस मध्ये मोदींच स्वागत केलं जाईल. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रतिनिधित्व स्तरावर द्विपक्षीय बैठक होईल. त्यानंतर मोदी हे US काँग्रेसला संबोधित करतील. त्यानंतर रात्री बायडन यांनी मोदींसाठी जेवणाच्या कार्यक्रमाच आयोजन केल आहे. 23 जूनला मोदी काही कंपन्यांच्या CEO सोबत चर्चा करतील. त्यानंतर कैनेडी सेंटर मधील एका कार्यक्रमात मोदी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.