Satara Politics: प्रकाश आंबेडकरांची ‘ती’ कृती म्हणजे ढोंगीपणा; उदयनराजेंची खोचक टीका

Satara News Today: उदयनराजे भोसले यांची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका
Satara Politics
Satara PoliticsSaam Tv
Published On

Udayanraje Bhosale News: वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले व नमस्कार केला. या घटनेवर बोलत असताना खा.उदयनराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वध करण्यासाठी आलेल्या औरंगजबाचे उदात्तीकरण कशासाठी असा संतप्त सवाल उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. (Latest Marathi News)

Satara Politics
Narendra Modi America Visit: यूएनमध्‍ये योग, जो बायडन यांच्या सोबत डिनर... असा असेल PM मोदींचा संपूर्ण दौरा

या वेळी बोलत असताना ते म्हणाले, आपल्या राज्यात अशा घटना घडत असतील तर ते निषेधार्थ आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज महान होते, असे आपण बोलतो तर दुसरीकडे त्यांच्या शत्रुचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार होत असेल तर ते घातक आहे. याला ढोंगी पणा नाही तर आणखी काय म्हणायचं अशी खोचक टीका उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर केली आहे.

आज ना उद्या देशातील राजकिय समीकरणे बदलतील. त्यावेळी काय अवस्था होईल.ही परिस्थिती अशीच राहिली तर आगामी वर्षाच्या आत देशातील समीकरणे बदलतील. राजकिय पक्षांचे तुकडे होतील. प्रत्येक राज्य एक देश होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

Satara Politics
Darshana Pawar Death Case: MPSC पास तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; शवविच्छेदन अहवालातून खळबळजनक माहिती समोर

नेमकं प्रकरण काय?

प्रकाश आंबेडकर हे खुलताबाद येथे औरंगजेबाच्या समाधीसमोर झुकले. त्यांनी औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? असे प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरुन शिवप्रेमींच्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या मजारीला फुले वाहतानाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीवर चादर देखील चढवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com