Maratha Reservation: मराठा आंदोलकांचं वादळ आज नवी मुंबईत धडकणार; मनोज जरांगेंचा मुक्काम कुठे असणार?

Maratha Andolan News: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेली मराठा आरक्षण पदयात्रा आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Saam TV
Published On

Manoj Jarange Maratha Andolan

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारीपासून सुरू झालेली मराठा आरक्षण पदयात्रा आज मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार आहे. लोणावळा येथून मोठ्या संख्येने मराठा बांधव नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेता शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Reservation
Weather Forcost: थंडी कमी होऊन तापमान वाढणार, ११ राज्यांमध्ये कोसळणार पाऊस; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव (Maratha Reservation) नवी मुंबईतील पोहचणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ही दिंडी नवी मुंबईत आल्यानंतर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी उद्या जड आणि अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मनोज जरांगे यांच्यासह मराठा पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यानुसार, बाजार समितीमधील कांदा बटाटा बाजार आवारात या मोर्च्याचा मुक्काम होणार आहे. (Latest Marathi News)

तसेच महिला आंदोलकांच्या राहण्याची व्यवस्था सिडको प्रदर्शन केंद्रात करण्यात आली आहे. नवी मुंबई केमिस्ट आणि ड्रग असोसिएशनच्या वतीने आरोग्यसुविधा सज्ज ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णालयात ५० टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत.

प्रत्येक दोन किमीवर वैद्यकीय पथक ठेवण्यात आले आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिरंगा फडकवून लाखोंच्या संख्येने हा मोर्चा पुढे मुंबईत जाणार आहे. दुसरीकडे सरकारकडून जरांगे यांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रयत्न देखील निर्माण होऊ शकते, असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांची मनधरणी सुरू आहे.

Maratha Reservation
Shocking News: सरकारी अधिकाऱ्याच्या घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटा मोजताना मशीन बंद, अधिकारीही थकले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com