Mumbai Local Train News: कल्याण रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, चाकरमान्यांची तारांबळ

Mumbai Local Train News: मंगळवारी पहाटेच्या सुमारास कल्याण रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाला. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेला बसत आहे.
Mumbai Local Train News Technical fault at Kalyan railway station Central Railway traffic 15 to 20 minutes late
Mumbai Local Train News Technical fault at Kalyan railway station Central Railway traffic 15 to 20 minutes lateSaam TV
Published On

Mumbai Local Train Latest News: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास कल्याण रेल्वेस्थानकावर तांत्रिक बिघाड झाला. याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेला बसत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. त्यामुळे भल्यापहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. (Latest Marathi News)

Mumbai Local Train News Technical fault at Kalyan railway station Central Railway traffic 15 to 20 minutes late
Heart Attack: उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुकलीला हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांनी असा वाचवला जीव

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनकडे (Mumbai Local Train) बघितलं जातं. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. अशातच लोकल सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान असाच काहीसा प्रकार घडला.

कल्याण रेल्वेस्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतूक सेवेला बसला. मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने सुरू आहे. भल्यापहाटे लोकल सेवेचा खोळंबा झाल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. रेल्लेस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, रेल्वेप्रशासनाकडून बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे.

Mumbai Local Train News Technical fault at Kalyan railway station Central Railway traffic 15 to 20 minutes late
Road Accidents: राज्यात रस्ते अपघातात मोठी वाढ, ७ महिन्यात ८ हजारांहून अधिक मृत्यू; पुण्यातील आकडेवारी धडकी भरवणारी

धावत्या लोकलमधून उतरताना तरुणीचा मृत्यू

गाडीत चढल्यानंतर लोकल जलद असल्याचे समजताच घाईत धावत्या लोकलमधून उतरण्याच्या नादात १७ वर्षीय चिमुकली प्लॅटफॉर्मवर कोसळली. डोक्याला जबर मार लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना रविवारी दुपारसच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वेस्थानकावर घडली.

भाग्यश्री शंकर शिंदे (१७, रा. कृष्ण गोपाळ म्हात्रे चाळ, कुंभारखान पाडा, डोंबिवली पश्चिम) असे मृत मुलीचे नाव आहे. रविवारी ती मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी लोकल प्रवास करताना हा अपघात झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत असून प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन रेल्वेप्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com