Mega Block Tomorrow: रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा...

Mega Block on Sunday: रविवारी रेल्वेरुळांसह सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घोषित करण्यात येतो.
Mumbai Local Train Mega Block Sunday 27 August 2023 Marathi News
Mumbai Local Train Mega Block Sunday 27 August 2023 Marathi NewsSaam tv
Published On: 

Mumbai Local Train Mega Block Tomorrow: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत असलेल्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत. (Latest Marathi News)

मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनकडे बघितलं जातं. प्रत्येक रविवारी रेल्वेरुळांसह सिग्नलच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घोषित करण्यात येतो. अशातच उद्या (२७ ऑगस्ट) ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे.

Mumbai Local Train Mega Block Sunday 27 August 2023 Marathi News
Mumbai Rain News: मुंबईत पाऊस परतल्याने नागरिकांमध्ये आनंदी आनंद; आता राज्यभरात कधी कोसळणार?

पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणादरम्यान शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर असलेल्या पनवेल ते वाशी मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ मेगाब्लॉक घेण्यात येईल.

Mumbai Local Train Mega Block Sunday 27 August 2023 Marathi News
Eknath Shinde News: शिंदे गटाने रणनिती आखली, ठाकरे गटापाठोपाठ आता काँग्रेसलाही खिंडार पाडलं

परिणामी सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर, ठाणे ते पनवेल, नेरूळ ते ठाणे, नेरूळ ते खारकोपरदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. मात्र, असं असलं तरी सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद शनिवारी रात्री ११.५० ते रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.