Eknath Shinde News: शिंदे गटाने रणनिती आखली, ठाकरे गटापाठोपाठ आता काँग्रेसलाही खिंडार पाडलं

Mumbai Mahapalika Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या पक्षाची बांधणी सुरू केली असून ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसला धक्के देण्यास सुरूवात केली आहे.
Congress 5 former corporators to Join Shinde group Today Mumbai Mahapalika Election
Congress 5 former corporators to Join Shinde group Today Mumbai Mahapalika ElectionSaam TV
Published On

Eknath Shinde Latest News: आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते. राज्य निवडणूक आयोग निवडणुकीची कधीही घोषणा करू शकतं. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

प्रत्येक पक्षाच्या गोटात महत्वाच्या हालचाली घडत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या पक्षाची बांधणी सुरू केली असून ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

Congress 5 former corporators to Join Shinde group Today Mumbai Mahapalika Election
Raigad Breaking: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; सार्वजनिक बांधकाम मंत्री कोंडीत अडकले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे (Congress) ५ माजी नगरसेवक आज शिवसेना शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात ४ वाजता हे पाचही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

पुष्पा कोळी, वाजीद कुरेशी, भास्कर शेट्टी आणि गंगा कुणाल माने अशी या नगरसेवकांची नावे असून त्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे सोपावले आहेत. विशेष बाब म्हणजे, यामधील ३ माजी नगरसेवक वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील आहेत.

Congress 5 former corporators to Join Shinde group Today Mumbai Mahapalika Election
Sharad Pawar News: ईडीला घाबरून मुश्रीफांनी तो निर्णय घेतला; शरद पवारांचा टोला...

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातून आतापर्यंत १७ माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदे गटाची ताकद वाढताना दिसून येत आहे. मुंबई महापालिका निवडणूक आणि शिवसेना पक्ष यांचा फार जवळचा संबंध आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पण आज परिस्थिती फार वेगळी आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी, तसेच भाजपसाठी देखील महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईकर शिवसेनेच्या या विभाजनाकडे कोणत्या दृष्टीकोनाने पाहतात हे या निवडणुकीतून स्पष्ट होऊ शकतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com