Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSaam TV

Sharad Pawar News: ईडीला घाबरून मुश्रीफांनी तो निर्णय घेतला; शरद पवारांचा टोला...

Sharad Pawar On Hasan Mushrif: सत्तेचा गैरवापर करून अन्याय-अत्याचार करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे.
Published on

Maharashtra Political News:

राज्याचं राजकारण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे चांगलंच ढवळून निघालं आहे. ईडीच्या भीतीने अनेक आमदारांनी विचार बदलल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणत आहेत. अशात आता पवारांनी अजित पवार गटातील हसन मुश्रीफांवर देखील गंभीर आरोप केलेत. सत्ताधारी पक्षाला खुश करत मुश्रीफांनी स्वत:ची सुटका करुन घेतली, असा टोला शरद पवारांनी लगावलाय. (Latest Marathi News)

"ज्यांनी अनेक वर्षे आमच्यासोबत काम केलं, त्यांची चौकशांच्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी नसावी. त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षाला खुश करण्यासाठी त्यांनी सांगितलेला कार्यक्रम राबवला आणि आपली सुटका करून घेतली. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला असं वाटतं की, सत्तेचा गैरवापर करून अन्याय-अत्याचार करत असेल तर लोकशाहीमध्ये त्याच्याशी संघर्ष केला पाहिजे आणि ती भूमिका आमच्या लोकांनी घेतल्याचं पवार म्हणाले.

Sharad Pawar News
Rajasthan Crime News: हे कसलं प्रेम! धावत्या दुचाकीवरुन शिक्षिकेवर तलवारीने सपासप वार; महिलेवर उपचार सुरू

हसन मुश्रीफ यांनी सत्ताधारी पक्ष्याला खुश करून आपली सुटका करून घेतली आहे. त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरु होती. मात्र त्यांनी सत्ताधाऱ्यांना साथ देत आपल्यावरील कारवाई थांबली. जे तुरुंगात गेले नाहीत ते आता आमच्याविरोधात भाष्य करतायत, अशा शब्दांत शरद पवारांनी मुश्रीफांवर निशाणा साधलाय.

अजित पवार यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका

अजित पवारांविषयी शरद पवारांनी काल एक खळबळजनक वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याने परत एकदा संभ्रमजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्रनंतर पवारांनी आपण असं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं. त्यावरुन आज नाशकात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना पुन्हा एकदा अजित पवारांवरुन प्रश्न विचारण्यात आला.

Sharad Pawar News
Nashik Crime News: २५ पेक्षा जास्त वार करुन तरुणाला संपवलं, घटनेनं नाशिक हादरलं

मात्र यावेळी अजित पवार यांच्यावर पुन्हा प्रश्न विचारू नका असं त्यांनी म्हटलं. भाजपने ईडीचा सीबीआयचा वापर करुन पाहिला आहे. आमच्यातून काही आमदार वेगळे झाले ही वस्तूस्थिती आहे. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जातोय, अशा शब्दांत पवारांनी भाजपवर ताशेरे ओढलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com