Mumbai Maharashtra Rain Update: पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पाऊस परतला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, मुंबईत दाखल झालेला पाऊस आता महाराष्ट्रात कधी परतणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Latest Marathi News)
अशातच हवामान खात्याने (IMD Alert) पावसाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. येत्या 48 तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यापार्श्वभूमीवर काही भागांना यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.
शनिवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि विदर्भाला जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. याशिवाय पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. शनिवारी सकाळपासून पुण्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची गती वाढली आहे. त्यामुळे आजपासून म्हणजेच शनिवारपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळतील. दरम्यान, हवामान खात्याने पावसाबाबतची अपडेट दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पु्न्हा एकदा पावसाला (Mumbai Rain) सुरूवात झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बँटिंग सुरू आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून अधून मधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. कुर्ला पश्चिमेत सीएसटी परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळं रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.