Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावरील वेगवेगळ्या अपघातांमध्ये आतापर्यंत शेकडो प्रवाशांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महामार्गावर झालेल्या अपघातांची सखोल माहिती दिली. विशेष बाब म्हणजे त्यांनी अपघातांचं धक्कादायक कारणही सांगितलं आहे.
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत वाहनांच्या पुढे अचानक प्राणी आल्यामुळे ८३ अपघात झाले. यामध्ये एकाचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची माहिती रवींद्र सिंगल यांनी दिली.
त्याचबरोबर याच कालावधीत वाहनाच्या अतिवेगाने तसेच टायर फुटण्याच्या घटनांमध्ये समृद्धी महामार्गावर ७२९ अपघात झाले. त्यापैकी ३३८ अपघातात (Accident) कुणीही जखमी नाही. तर ३९१ किरकोळ व गंभीर अपघातात १०१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं रवींद्र सिंगल यांनी सांगितलं.
याशिवाय ७४८ प्रवासी अपघातात जखमी झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे मध्यरात्री १२ ते ३ वाजेच्या दरम्यान झाले असून पहाटे ३ ते ६ वाजेच्या दरम्यान ८ अपघातात ९ मृत्यू झाले.
समृद्धी महामार्गावर पहाटे ६ ते दुपारी १२ पर्यंत १३ अपघात झाले असून यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्याचं सिंगल यांनी सांगितलं. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत झालेल्या अपघातात १७ मृत्यू झाले तर रात्री ९ ते १२ पर्यंत पाच अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रवींद्र सिंगल यांनी दिली.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आलं असून महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची फिटनेस टेस्ट केली जात असल्याचंही रवींद्र सिंगल यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर ट्रॅव्हल्सची देखील नियमित तपासणी होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.