Mumbai Local Train: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Local Train Mega Block: मुंबईकरांच्या प्रवासाचा रविवारी (ता. ३१ मार्च) खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर भर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Local Train Mega Block
Mumbai Local Train Mega BlockSaam TV

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबईकरांच्या प्रवासाचा रविवारी (ता. ३१ मार्च) खोळंबा होण्याची शक्यता आहे. कारण, लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर भर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local Train Mega Block
Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत खुशखबर! रेल्वेमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर करत दिली मोठी बातमी

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर धावतील. (Breaking Marathi News)

हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. (Latest Marathi News)

त्याचबरोबर पनवेल येथून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर / नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान बंदर मार्गावरील सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येईल.

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.

Mumbai Local Train Mega Block
CCTV Footage : धावती ट्रेन पकडताना पाय घसरला अन् तो रेल्वे रुळांमध्ये अडकला; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com