ट्रेनने प्रवास करताना धवती ट्रेन पकडूनये, दरवाजाजवळ उभे राहूनये, अशा अनेक सूचना दिल्या जातात. मात्र प्रवासी वाहतुकीचे हे सर्व नियम सर्रास मोडतात. धावती ट्रेन पकडताना अपघात होऊन आजवर अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता देखील अशीच एक थरार घटना समोर आलीये. मात्र आरपीएफ कर्मचार्याच्या प्रसंगावधाने प्रवाशाचा जीव वाचला आहे.
सदर घटना पुणे रेल्वे स्थानकात घडली आहे. एक प्रवासी व्यक्ती धावती एक्सप्रेस ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेन पकडत असताना त्याचा पाय घसरतो आणि तो रेल्वे रुळ आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकून पडतो. प्रवासी ट्रेनसह काही अंतर पुढे फरपटत येतो. तितक्यात प्लॅटफॉर्मवर असलेल्या आरपीएफ जवानाची नजर प्रवाशावर पडते.
आरपीएफ जवान प्रसंगावधन दाखवत प्रवाशाकडे धावत जातात आणि त्याला रेल्वेतून बाहेर खेचतात. अवघ्या ९ सेकंदात हा थरार घडतो. काळजात धडकी भरवणारी ही घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
धावत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाला आरपीएफ कर्मचार्याच्या प्रसंगावधतेने जीवनदान मिळाले आहे. हा प्रवासी उद्यान एक्सप्रेसमधून उतरताना अपघात झाला आहे. आरपीएफ जवाने तात्काळ मदत केल्याने त्यांचे आता कौतुक होत आहे.
सोशल मीडियावर अपघाताच्या घटनांचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नागरिक अनेकदा ट्रेनने प्रवास करताना रेल्वे स्थानकांवर ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळांवरून ये जा करतात. रुळांमध्ये पाय अडकून पडल्याने देखील आजवर अनेकांचा मृत्यू झालाय.
मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर नेहमी गर्दी भरलेली असते. गर्दीमधून वाट काढत मुंबईकर रोज प्रवास करतात. ऑफिसला पोहचण्यास उशिर होऊ नये यासाठी काहीजण तर ट्रेनच्या डब्ब्याला लटकून देखील प्रवास करतात. यातही आजवर अनेकांचा मृत्यू झालाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.