Mumbai Local Train: बदलापूर फास्ट लोकल वेळेवर आली, पण स्टेशनवर न थांबताच पुढे गेली; लोको पायलटच्या कृतीनं प्रवाशी बुचकळ्यात

Badlapur Fast Local Train: बदलापूर फास्ट लोकल ट्रेन विक्रोळी स्टेशनवर न थांबता पुढे गेली. लोको पायलट गाडी न थांबवता पुढे घेऊन गेल्यानं प्रवासी चकित झाले.
Badlapur Fast Local Train:
Passengers wait at Vikhroli station as Badlapur fast local skips scheduled halt, sparking safety concerns.saam tv
Published On
Summary
  • फलाटावरील प्रवाशांनी हात दाखवून लोक पायलटला इशारा केला

  • लोको पायलट वेगात असल्याने गाडी फलाटापासून पुढे गेली

  • बदलापूर जलद लोकल फलाटावर न थांबता पुढे गेली

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुंबईत लोकल उशिराने येणे, ट्रेनमधून कोणता प्रवाशी पडण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पण मुंबई लोकलचा लोको पायलट हॉल्ट विसरल्याची घटना कधी ऐकली का? कुत्रा माणसाला चावला याची बातमी होत नाही पण माणूस कुत्र्याला चावला त्याची बातमी होते,त्याचप्रमाणे ही विक्रोळीत ही घटना घडली आहे.

Badlapur Fast Local Train:
Mumbai Local : प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! १४ एप्रिल रोजी मध्यरात्री धावणार विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

ट्रेन उशिराने स्थानकात आली याची बातमी नाहीये, पणथांबा असलेल्या स्टेशनमध्ये थांबण्याऐवजी लोको पायलट ट्रेन सुसाटपणे रेल्वे पुढे गेला याची मात्र बातमी आहे. ही घटना घडली आहे, मुंबईच्या विक्रोळी स्थानकात. बदलापूर जलद लोकल विक्रोळीला ५.५२ मिनिटांनी येत असते. ही ट्रेन आली त्यावेळी आली देखील परंतु विक्रोळीला थांबा न घेता ट्रेन सरळ पुढे गेली.

Badlapur Fast Local Train:
Railway News : ‘रेलवन’ अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटी, प्रवासी टीसीला पाहून चालू ट्रेनमध्ये काढतायत तिकीट; काय आहे नेमकं प्रकरण?

लोको पायलट विक्रोळीला ट्रेन थांबवण्याचे विसरला होता, त्यामुळे तो ट्रेन थेट पुढे घेऊन गेला. विक्रोळीच्या प्लॅटफॉर्मवर उभे असलेल्या प्रवाशांनी लोक पायलटला थांबण्याचा इशारादेखील केला. मात्र लोको पायलट वेगात असल्याने गाडी फलाटापासून पुढे गेली.

मध्यरेल्वे मार्गावर धावणार स्वयंचलित दरवाजाची नॉन एसी लोकल

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच स्वयंचलित दरवाजे बंद होणारी नॉन एसी लोकल दाखल होणार आहे. या रेल्वेची सुरक्षितता आणि सुविधा जनक प्रवास असा दृष्टीने विविध चाचणी घेण्यात येणार आहे. ही लोकल चेन्नईतील पेराबुर येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार करण्यात आली आहे. ही लोकल मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे.

सोलापूर विभागातील स्थानकावर या गाडीचा अधिकृत स्वीकार करण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तांत्रिक तपासणीसाठी आणि सेवेत दाखल करण्यासाठी ही गाडी कुर्ला कारशेडमध्ये दाखल होणार आहे. मुंब्रा स्थानकाजवळ जून 2025 मध्ये ट्रेनमधून पडून प्रवासांचा मृत्यू झाला होता त्यानंतर रेल्वेमध्ये अश्विनी वैष्णव यांनी सप्टेंबर मध्ये लोकल गाड्यांमध्ये बंद दरवाजाची प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्याची घोषणा केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com