Mumbai : मुंबई लोकलमध्ये पॉवर बँकचा अचानक स्फोट! बॅगला आग लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Mumbai Local News : मुंबई लोकलच्या महिला डब्यात पॉवर बँकचा स्फोट होऊन बॅगला आग लागली. प्रवाशांनी अलार्म चेन ओढून लोकल थांबवली आणि पाणी टाकून आग विझवली. घाटकोपर स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाली नाही.
Mumbai Local Train Power Bank Blast News
Mumbai Local Train Power Bank Blast News AI Image
Published On: 
Summary
  • मुंबई लोकलच्या महिला डब्यात पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला

  • स्फोटानंतर प्रवाशाच्या बॅगला आग लागल्याने डब्यात घबराट

  • प्रवाशांनी प्रसंगावधान राखत लोकल थांबवली

  • घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

साक्षी यादव, मुंबई

मुंबई लोकलच्या महिला डब्यात प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट होऊन बॅगला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे डब्यातील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. प्रसंगावधान राखत प्रवाशांनी अलार्म चेन ओढून लोकल थांबवली. त्यानंतर प्रवाशांनी तातडीने जळणारी बॅग डब्याबाहेर काढून पाणी टाकत आग विझवली. या घटनेमुळे लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकल ट्रेन क्रमांक DBL-2 च्या महिला डब्यात एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेल्या पॉवर बँकचा अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर बॅगने पेट घेतल्याने डब्यात धुराचे आणि आगीचे वातावरण निर्माण झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही काळ डब्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रवाशांनी तत्काळ अलार्म चेन ओढून लोकल थांबवण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Local Train Power Bank Blast News
Colon Cancer : पाइल्स समजून दुर्लक्ष करू नका! 'ही' ६ लक्षणे कॅन्सरची असू शकतात; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

लोकल थांबताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जळणारी बॅग डब्यातून बाहेर काढली. त्यानंतर बॅगेवर पाणी टाकून आग विझवण्यात आली. प्रवाशांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, घटनेनंतर TSRT कर्मचारी राहुल यांनी अलार्म चेनची यंत्रणा पूर्ववत केली. मात्र पॉवर बँकचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही लोकल घाटकोपर रेल्वे स्थानकात दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांपासून १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत थांबवण्यात आली होती.

Mumbai Local Train Power Bank Blast News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

पॉवर बँकसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास आग लागण्याचा किंवा स्फोट होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी खराब झालेली किंवा फुगलेली पॉवर बँक वापरणे टाळावे, तसेच प्रवासादरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com