अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : मुंबई आणि कल्याण परिसरात सकाळापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेवरील प्रवाशांना फटका बसला आहे. आज सोमवारी मध्य रेल्वे दिवसभरातून दुसऱ्यांदा विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ एक्स्प्रेसमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस ट्रॅकवर थांबली आहे. तर दुसरीकडे ट्रॅकवर लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबईसह आजूबाजूच्या शहरात सर्वत्र पावासाची संततधार सुरु आहे. या जोरदार पावसाचा रस्ते वाहतुकीसहित रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. या मुसळधार पावसामुळे तिन्ही रेल्वे वाहतूक सेवांना फटका बसला.
पावसामुळे या तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने धावत होत्या. हार्बर मार्गावरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने धावत होती. तर मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशिराने सुरु होती. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजळ माऊ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे एक्स्प्रेस ट्रॅकवरच ठप्प झाली. त्यामुळे एक्स्प्रेसच्या मागून येणाऱ्या लोकल ट्रेन खोळंबल्या. इंजिनच्या बिघाडामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे ट्रॅकवर लांबच लांब रांगा लागल्या. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचेही प्रचंड हाल झाले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने नवीन इंजिन घटनास्थळी दाखल झाले.
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडलं आहे. या एका जॅकेटमुळे पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे तब्बल चर्चगेटवरून विरारकडे जाणारी रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. वायरवरील जॅकेट काढण्याचे आरपीएफ जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. हे जॅकेट ओव्हरहेड वायरवर कसं आलं, याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.