Gadchiroli Heavy Rain : गडचिरोलीत मुसळधार पाऊस; घरांमध्ये शिरले पाणी, चार राष्ट्रीय महामार्गांसह २५ जिल्हा मार्ग बंद

Gadchiroli News : राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. प्रामुख्याने विदर्भात सगळीकडे पावसाने पाणीच पाणी झाले आहे. नागपूर शहरात देखील सर्वदूर पाणी साचले आहे
Gadchiroli Heavy Rain
Gadchiroli Heavy RainSaam tv
Published On

मंगेश भांडेकर 

गडचिरोली : नागपूर विदर्भात पावसाने हाहाकार माजविला आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. दरम्यान जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील राधे बिल्डिंग परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

Gadchiroli Heavy Rain
Monkey Attack : माकडाच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी; शाळेच्या आवारात मुले खेळत असताना घडली घटना

राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजविला आहे. प्रामुख्याने विदर्भात सगळीकडे पावसाने पाणीच पाणी झाले आहे. नागपूर शहरात देखील सर्वदूर पाणी साचले आहे. हीच परिस्थिती गडचिरोली (Gadchiroli) शहरात देखील पाहण्यास मिळत आहे. दरम्यान काल रात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती. तर सध्या रिमझिम पाऊस सुरू असला तरी अनेक नदी- नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तर पावसामुळे शहरी भागातही नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. 

Gadchiroli Heavy Rain
Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाइन सशुल्क दर्शन पासला विरोध; सुविधा रद्द करण्याची पुजारी बांधवांची मंदिर संस्थानकडे मागणी

अनेक मार्ग वाहतुकीसाठी झाले बंद 
गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले असून सध्या गंभीर पूरपरिस्थिती गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळे अनेक भागात दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती उद्भवत असते. तर दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झाले आहेत. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली- नागपूर, गडचिरोली- आष्टी, भामरागड- आल्लापल्ली व आल्लापल्ली- सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह २५ जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com