Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला! मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेला फटका; लोकल ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा...

Mumbai Rain News Traffic Local Update: काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे.
Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला! मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेला फटका; लोकल  ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा...
Mumbai Local TrainSaam Tv
Published On

वैदेही कानेकर| मुंबई, ता. १८ जुलै २०२४

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू असून सकल भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. मुंबईमधील पावसाचा फटका मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. जाणून घ्या लोकलची सद्यस्थिती.

मुंबईत पावसाचा जोर वाढला

आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. काल दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे. मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

रेल्वे वाहतूकीवर परिणाम

मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे 10 मिनिटं उशिराने तर मध्य रेल्वे 20 मिनिटं उशिराने धावत आहे. सध्या कोणत्याही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले नसून रेल्वे वाहतूक सुरळित सुरू आहे. फक्त लोकल काही मिनिटे उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. मात्र पावसाचा जोर असाच राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला! मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेला फटका; लोकल  ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा...
Maharashtra Politics: शिवसेनेत मोठ्या राजकीय घडामोडी! अंबरनाथ आणि उल्हासनगर कार्यकारणी बरखास्त ; पक्षश्रेष्ठींचा महत्वाचा निर्णय

पाणी साचायला सुरुवात...

ठाणे शहरात काल दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पहाटे पासुन पुन्हा सुरुवात केली आहे. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे अजूनतरी सखल भागात पाणी साचलेले नाही. पण आज दिवसभर रिपरिप सुरूच राहणार आहे. तसेच नवी मुंबईमध्येही पावसाचा जोर कायम असून हिंदू कॉलनी येथे पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai Local Train Updates: मुंबईत पावसाचा जोर वाढला! मध्य रेल्वे अन् पश्चिम रेल्वेला फटका; लोकल  ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा...
Pune Crime News: तुरुंगातून सुटून आला, अन् तिघांनी गाठून काटा काढला; पुण्यातल्या येरवड्यामध्ये तरुणाची निर्घृण हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com