मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा; रविवारी प्रवाशांचे मेगा हाल होणार, कसं असेल वेळापत्रक?

mega block : मध्य रेल्वेने मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारी हजारो प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
CENTRAL RAILWAY MEGA BLOCK
CENTRAL RAILWAY MEGA BLOCK UPDATE Saam Tv
Published On
Summary

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉकची घोषणा

मेगाब्लॉकमुळे होणार प्रवाशांचे मेगाहाल

मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरील वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मेगाब्लॉकच्या घोषणेमुळे प्रवाशांचे मेगा हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड दरम्यान तर ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी जाहीर केलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

CENTRAL RAILWAY MEGA BLOCK
आता WhatsApp Chat ला सुद्धा पिन करता येणार, इतर नवीन भन्नाट Features ही होणार लॉन्च

मध्य रेल्वेने माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान मेगाब्लॉकची घोषणा केली असून अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आपल्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील. तर नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या वेळापत्रकानुसार थांबतील. माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरही मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. या मार्गावर अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द असणार आहेत.

CENTRAL RAILWAY MEGA BLOCK
देशातील किती राज्यांमध्ये भाजपचा डंका; 78 टक्के लोकसंख्येवर भाजपचं राज्य

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी १६.०७ पर्यंत वाशी / नेरुळ / पनवेल येथे जाणाऱ्या डाउन लाईन सेवा आणि पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी १६.०९ पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com