Mumbai Local: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 11 ते 4 वाजेदरम्यान नाही धावणार लोकल; का, कधी, कुठे असणार सेवा ठप्प? जाणून घ्या

Mumbai Local Train Sunday Mega Block News: मेगा ब्लॉकमुळे रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबई लोकल सेवा बंद राहतील. का, कधी आणि कोणत्या मार्गांवर परिणाम होणार ते जाणून घेऊया.
Mumbai Local Train Sunday Mega Block News:
Mumbai Local Train Update saam tv
Published On
Summary
  • रविवारी 11 ते 4 या वेळेत मुंबई लोकल सेवा बंद

  • रेल्वे देखभाल कामासाठी मेगाब्लॉक

  • मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील सेवा प्रभावित

प्रवाशी मित्रांनो तुम्ही लोकलनं नेहमी प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रविवारीच्या दिवशी लोकल सेवा ठप्प असणार आहे. लोकल ट्रेन ही मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हटलं जातं मात्र तीच सेवा ठप्प असणार आहे. का आणि कधी लोकल सेवा बंद राहणार असणार असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. काळजी नको त्याची उत्तरेही आम्ही या लेखात देत आहोत.

Mumbai Local Train Sunday Mega Block News:
Mumbai Local Train: रेल्वेचा मास्टरप्लान! आता दर ३ मिनिटांनी धावणार मुंबई लोकल

का असणार मेगा ब्लॉक?

मध्य रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगा ब्लॉक मध्य, हर्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर घेतला जाणार आहे. देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेतला जातो. मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल-दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी रविवार दि. ०८.०२.२०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर खालीलप्रमाणे मेगा ब्लॉक परिचालित करण्यात येणार आहे.

Mumbai Local Train Sunday Mega Block News:
Mumbai Local News : कल्याणच्या पुढे १५ डब्याची लोकल सेवा कधी धावणार? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली मोठी अपडेट

कुठे-कुठे असणार मेगा ब्लॉक?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर १०.५५ ते १५.५५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.४८ ते १५.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या उपनगरी सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून वळविण्यात येणार आहेत.

या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकात पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून १०.१९ ते १५.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या उपनगरी सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून वळविण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ व भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप व डाऊन हार्बर मार्गावर ११.०५ ते १६.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप व डाऊन हार्बर मार्गावर ११.०५ ते १६.०५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. पनवेल येथून १०.३३ ते १५.४९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ९.४५ ते १५.१२ दरम्यान बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर मार्ग विभाग

पनवेल येथून ११.०२ ते १५.५३ दरम्यान ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा तसेच ठाणे येथून १०.०१ ते १५.२० दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गावरील सेवा नियमितपणे चालू राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com