मुंबई : लोकल ट्रेनमधील वाढत्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेकडून १२ डब्याची लोकल सेवा सुरु करूनही या मार्गावर गर्दी पाहायला मिळते. पीक अवर्समधील गर्दीत प्रवाशांना प्रचंड दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. या मार्गावर १५ डब्याची लोकल ट्रेन ही कल्याणपर्यंत चालवली जाते. मात्र, आता कल्याण रेल्वे स्टेशनच्या पुढे काही कामे वेळेत पूर्ण झाल्यास १५ डब्याची लोकल सेवा ही वर्षभराच्या कालावधीनंतर धावू शकते, अशी एकंदरीत शक्यता आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
आता कल्याणपर्यंत १५ डब्याची लोकल सेवा सुरु आहे. कल्याणच्या पुढे १५ डब्याची लोकल सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी अधिक असावी लागते. त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानंतर १५ डब्याची लोकल सेवा पुढे चालवता येईल. या संदर्भातील कामांसाठी १ वर्षांचा अवधी लागायला हवा. मात्र, यात काही महत्वाची कामे अपूर्ण आहेत. त्यात भूसंपादनाचाही मुद्दा आहे. या सर्व बाबी पूर्ण करायच्या आहेत.
एखादी व्यवस्था बंद करुन काम करणे सोपे असते. मात्र, एखादी व्यवस्था सुरु असताना काम करणे अवघड असते. सुरु असलेल्या व्यवस्थेवर ताण येऊ न देता, काम करायला लागतं.
ठाणे, कल्याण पुढील भागातील वाढत्या प्रवाशी संख्यांचा विचार करता, यामार्गावर आणखी मार्गिकांची गरज लागणार आहे. रेल्वेच्या दोन्ही बाजूंना घरे आहेत. त्यामुळे भूसंपादनाचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
भूसंपदनाच्या वेळी रेल्वे विरोध देखील होतो. कल्याण ते मुरबाड हा रेल्वे प्रकल्पाचं काम सुरु करणार आहोत. त्यालाही भूसंपदनाच्या मुद्यावरून अडथळे येतात. आपल्याला सर्व लोकांमध्ये सकारात्मक भावना घेऊन जायची आहे. लोकल ट्रेनने ३७ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे लोकल सेवा पुरवताना, काही बिघाड झाला, तर त्याचा परिणाम या ३७ लाख प्रवाशांवर होतो.
रेल्वे वर्षांतून किमान अडीचशे दिवस तर योग्य वेळेत धावत असते. लोकलमधील पाच मिनिटांचा उशीर झाला तरी त्याचा परिणाम लाखों लोकांवर होतो. वर्षांतून पन्नास दिवस सोडले तर उर्वरित ३०० दिवसांपर्यंत ही लोकल वेळेवर धावते.
मागच्या वर्षाच्या डेटा काढला तर वर्षांतून २५८ वेळा लोकल ही वेळेवर स्टेशनवर पोहोचली. रविवारी आणि सुट्टी असे एकूण ३२ वेळा ट्रेन उशिराने धावली. या लोकल ट्रेन पाच ते पंधरा मिनिटे उशिराने धावत होत्या. फक्त ९ दिवस या लोकल ३० मिनिटांपेक्षा अधिक उशिराने धावत होत्या. एका लोकल ट्रेनमध्ये किमान १५०० प्रवासी असतात, उशीर झाल्यास या सर्वांना एकाच वेळी उशीर होतो. त्यामुळे ही रेल्वे उशीराने धावत असल्याची भावना निर्माण होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.