मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

local train : मुंबईतील लोकल गर्दी दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेवर लवकरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत १५ डब्यांची लोकल ट्रेन धावणार आहे.
Mumbai local train update
Mumbai local trainSaam tv
Published On
Summary

लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होणार

मध्य रेल्वेवर मार्च महिन्यात महत्वपूर्ण बदल पाहायला मिळणार

रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

मयूर राणे, साम टीव्ही

लोकल ट्रेन आणि प्रवाशांची गर्दी... असं समीकरणच झालं आहे. लोकलमधील गर्दीमुळे अनेकांना जीवाला देखील मुकावे लागले आहे. याच गर्दीवरून मुंबई उच्च न्यायालयानेही रेल्वे प्रशासनाला फटकारलं होतं. त्यानंतर रेल्वेने सुधारणा करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले. मध्य रेल्वेवर १५ डब्यांची ट्रेन चालवण्याचा गेमचेंजर निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबाजवणी मार्च महिन्यापासून होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकल ट्रेन उशिरा येणे आणि १५ डब्यांच्या ट्रेनबाबत बोलताना नीला म्हणाले, 'सकाळच्या पीक अवरमध्ये ज्या लोकल ट्रेन होत्या. त्या नऊ ते बारा मिनिटांनी उशिराने धावत होत्या. तर हार्बर मार्गावर सहा मिनिटांनी उशिराने धावत होत्या. पहिले कारण म्हणजे ज्या लांब पाल्याच्या गाड्यामुळे ट्रेन उशिराने धावत आहेत. धुक्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने शहरात येत आहे. मेल-एक्सप्रेस ट्रेन उशिरा शहरात आल्यामुळे बाकीच्या गाड्यांना उशीर होतोय'.

Mumbai local train update
ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

'मध्य रेल्वेद्वारे प्रामुख्याने दुपारच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून कल्याणपर्यंत पंधरा डब्याच्या प्लॅटफॉर्मचं काम हाती घेतलं आहे. यामुळे प्रवाशांना दुपारच्या वेळेस उशीर होत आहे.पण मार्चनंतर 15 डब्याच्या गाड्या आहेत, त्या निश्चितच चालू होणार आहेत. 25% क्षमता ही प्रत्येक ट्रेनच्या वारीमागे वाढते. सध्या आपल्याकडे हे कामे पूर्ण झाल्यानंतर या गाड्या आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे प्रवाशांचा निश्चित फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Mumbai local train update
धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गाड्या एक तास उशिराने धावत आहेत. यावर बोलताना जनसंपर्क अधिकारी स्वप्निन नीला म्हणाले, ' खोपोली, कर्जत किंवा बदलापूरवरून येणाऱ्या गाड्या 22 मिनिटे उशिराने धावत आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून दुपारी ब्लॉक घेतला जात आहे. तसेच हार्बर मार्गावर एक ट्रेस पासिंगची घटना झाली होती. मध्य मार्गावरील दिवा स्थानकावर काल संध्याकाळी आणि आज सकाळी सुद्धा गेटची समस्या उद्भवली. तो देखील सुधारण्यातही वेळ गेला. यासाठी दिवा स्थानकाचा लेवल क्रॉसिंगचा गेट कारणीभूत ठरला होता'.

Mumbai local train update
मोठी बातमी! भाजपनंतर शिंदे गटाने उधळलला विजयाचा गुलाल, पहिला उमेदवार बिनविरोध

'तो गेट संध्याकाळी पाच वाजून आठ मिनिटापासून ते पाच वाजून 31 मिनिटापर्यंत उघडा ठेवावा लागला होता. रस्त्याच्या ट्राफिकमुळे दोन्ही बाजूची रेल्वे वाहतूक खोळंबली होती. यामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून दिवा स्टेशनच्या गेटचं कामकाज रेल्वेने पूर्ण केलेय. त्याचं उर्वरित काम देखील लवकरात लवकर पूर्ण केले जाईल,असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com