मोठी बातमी! भाजपनंतर शिंदे गटाने उधळलला विजयाचा गुलाल, पहिला उमेदवार बिनविरोध

ratnagiri political news : भाजपनंतर शिंदे गटाने विजयाचा गुलाल उधळलला आहे. शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.
ratnagiri news
ratnagiri political news Saam tv
Published On
Summary

कोकणात राजकीय घडामोडींना वेग

कणकवलीत भाजपचा उमेदवार बिनविरोध, रत्नागिरीत शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. कणकवलीतील बिडवाडी पंचायत समितीत भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय. भाजपनंतर आता शिंदे गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

ratnagiri news
भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

रत्नागिरीच्या नाणीज पंचायत समिती गणातून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. नाणीज पंचायत समिती गण बिनविरोध करत सामंत यांची व्युव्हरचना चर्चेत आली आहे. आज गुरुवारी शेवटच्या दिवशी पद्मजा कांबळे यांच्या शिवाय एकही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे पद्मजा कांबळे यांचा एकमेव अर्ज निवडणुकीत आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

उदय सामंत यांचे स्वीय सहायक निवडणूक रिंगणात

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नेताजी पाटील पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहिले आहेत. नेताजी पाटील हे उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक असून कसोप पंचायत समिती गणामधून मैदानात उतरले आहेत.

ratnagiri news
ठरलं! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचा महौपार; मुंबईचं काय?

कणकवलीत भाजप उमेदवार बिनविरोध

सिंधुदुर्गाच्या कणकवली पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. कणकवलीतील बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरलाय. विद्या शिंदे यांना 2014 सालानंतर तीन अपत्ये झाली आहेत, यावरून भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी हरकत घेतली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवलाय. त्यामुळे बिडवाडी पंचायत समिती मतदार संघातून भाजपच्या संजना राणे बिनविरोध विजयी झाल्यात. संजना राणे यांच्या बिनविरोध विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच गावात एकच जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com