Central Railway disruption : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; उंबरमाळीजवळ मालगाडीचे इंजिन फेल, प्रवाशांचे हाल

Central Railway Issue: कसारा मार्गाहून जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळी थांब्यादरम्यान फेल झाल्याची घटना घडली आहे.
Central Railway Issue:
Central Railway Issue:Saam tv
Published On: 

फय्याज शेख

Central Railway Issue:

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. कसारा मार्गाहून जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळी थांब्यादरम्यान फेल झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे आसनगाव-कसारा मार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा मार्गाहून जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन उंबरमाळीजवळ फेल झाल्याची घटना घडली आहे. मालगाडीचे इंजिन बंद झाल्यामुळे डाऊन मार्ग ठप्प झाला आहे. इंजिन बंद पडल्यामुळे आसनगाव, कसारा मार्गावर जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे आसनगाव-कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Central Railway Issue:
Kolhapur News: कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत; कडकडून चावा घेत ४०० हून अधिक नागरिक जखमी

कसारा आणि खर्डीदरम्यान उंबरमाळीजवळ मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कसारा लोकल आसनगाव स्टेशनवर रद्द केल्याने कसाऱ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहे. तर कसारा लोकल ही आसनगावहून पुन्हा सीएसएमटीकडे रवाना करण्यात आली आहे.

Central Railway Issue:
Satyapal Malik: 'मी लिहून देतो, आता मोदी सरकार पुन्हा येणार नाही'; राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिकांचं मोठं विधान

दरम्यान, कसाऱ्याहून इंजिन आले असून १५ मिनिटात मालगाडी इंजिन टोचन करून कसाऱ्याकडे रवाना करण्यात येणार आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्यामुळे रेल्वे ट्रॅकवर वाहतूक कोंडी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.