Kolhapur News: कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत; कडकडून चावा घेत ४०० हून अधिक नागरिक जखमी

Dog Attack 400 People: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे.
Kolhapur News
Kolhapur NewsSaam TV
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

Kolhapur News:

भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यात हैदोस घातलाय. कोल्हापूर शहर आणि परिसरात कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यात जवळपास ४०० पेक्षा अधिक नागरिक जखमी झालेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Kolhapur News
Pune Crime: पिझ्झा वेळेत न आल्याने तरुण संतापला; डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग, नागरिकांमध्ये घबराट

कोल्हापुरात कुत्र्यांचा कुणाच्या पायाला चावा, तर कोणाच्या हाताला चावा, तर याच कुत्र्यांनी कोणाला गाडीवरून पडलं देखील आहे. कोल्हापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत सुरू आहे. भटक्या कुत्र्यांनी कोल्हापूरकरांना अक्षरशः हैराण केलंय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचे घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे.

जिथे बघाल तिथे या भटक्या कुत्र्यांचे झुंड बसलेले दिसतात. अनेकांवर या कुत्र्यांनी हल्ले केल्याने शहरात सध्या फिरणंही मुश्किल झालं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने भटकी कुत्री पकडण्यासाठी श्वानपथकही काम करतंय. मात्र भटक्या कुत्र्यांची संख्या एवढी वाढली आहे की, अनेक कुत्री या श्वानपथकालाही गुंगारा देत आहेत.

कोल्हापुरात गेल्या आठवड्याभरात 400 पेक्षा अधिक जणांना कुत्रे चावल्याने त्यांच्यावरती सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहीजण सीपीआर रुग्णालयातून ओपीडी बेसिसवर उपचार घेवून तपासणीसाठी घरी गेलेत. सध्या कोल्हापूरात कुत्र चावल्यानंतर देण्याचे औषध उपलब्ध असून त्याचा मुबलक साठा असल्याचे वैद्यकीय अधिष्ठाता यांनी सांगितले आहे.

एवढेच नाही तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पायातही कुत्र्यांनी घुटमळायला मागं पुढं पाहिलं नाही. सीपीआर रुग्णालयात विविध विभागांना भेट देताना त्यांच्यासमोर कुत्री आल्यानं. त्यांनी अधिष्ठातांना कुत्री पाळलयात का ? असं विचारलं.

कोल्हापूर सीपीआर रुग्णालयातील आकडेवारी पाहुयात

रुग्णसंख्या आणि वार

56 - रविवार

92-शनिवारी

62 - शुक्रवार

59- गुरुवार

77 -बुधवार

90-मंगळवार

35 - बुधवार (१२पर्यंत)

कोल्हापूर शहरात कुत्र्याने हल्ला केल्यामुळे अनेकांचे अपघात होवून ते जखमी पण झालेत. तर दुसरीकडे कुत्रे चावण्याचे प्रमाण हे अधिक असल्यामुळे अनेकांना यात जीव गमवावा लागलाय. तर काहीजण सीपीआरमध्ये उपचार घेऊन घरी येत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत.

एकूणच पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुत्र्यांनी माणसाला चावल्याची संख्या मोठी दिसून येते. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे वाभाडे निघत असताना महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र गेंड्याच्या कातडीचा असल्याच्या भावना लोकांच्या मनात दिसून येतायत.

Kolhapur News
Crime News : मुलीने गरबा स्पर्धेत जिंकली २ बक्षिसे, वडिलांची बेदम मारहाण करत हत्या, नेमकं काय आहे प्रकरण?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com