Pune Crime: पिझ्झा वेळेत न आल्याने तरुण संतापला; डिलिव्हरी बॉयला मारहाण करत हवेत फायरिंग, नागरिकांमध्ये घबराट

Customer Beaten Pizza Delivery Boy: वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतो.
Pune Crime
Pune CrimeSaam TV
Published On

Pune Crime News:

पुण्याजवळील वाघोलीत असलेल्या वाघेश्वर मंदिराजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे.पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशिर झाल्यानं चिडलेल्या ग्राहकानं पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारण केलीये. एवढेच नाही तर या व्यक्तीने संतापात हवेत फायरिंग देखील केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Crime
UP Crime News: धक्कादायक! मजुराचा खून करून मृतदेह शेतात पुरला; त्यावर बटाट्याची केली लागवड, पोलीसही चक्रावले

चेतन असे डिलिव्हरी बॉयला मारण करुन फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर रोहित असं डिलिव्हरी बॉयचं नाव आहे. तो वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. काल रात्री उशिरा आरोपी चेतन पडवळ याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता.

पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रोहितला मारण केली. या महाराणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र, राहुल आणि इतर काहीजण गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण केली. तसेच आपल्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केली, असा आरोप करण्यात आलाय.

सदर घटनेनंतर रोहित आणि त्याच्यासोबत आलेल्या इतरांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी आरोपीवर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय‌. पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. अशा घटनांमुळे सामान्य जनतेत देखील घबराट पसरली आहे.

Pune Crime
UP Crime News: धक्कादायक! मजुराचा खून करून मृतदेह शेतात पुरला; त्यावर बटाट्याची केली लागवड, पोलीसही चक्रावले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com