Satyapal Malik: 'मी लिहून देतो, आता मोदी सरकार पुन्हा येणार नाही'; राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिकांचं मोठं विधान

Satyapal Malik News: 'मी लिहून देतो की, मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी बोलताना केलं.
Satyapal Malik
Satyapal MalikSaam tv
Published On

Satyapal Malik News:

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल यांच्या संवाद साधला. राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी तब्बल २८ मिनिटे चर्चा केली. सत्यपाल मलिक यांनी या संवादात पुलवामा, शेतकरी आंदोलन, किमान आधारभूत किंमत, जातनिहाय जनगणना, मणिपूर हिंसा या विविध विषयावर भाष्य केलं.

या चर्चेदरम्यान, सत्यपाल मलिक यांनी निवडणुकीसाठी ६ महिने बाकी राहिले आहेत. मी लिहून देतो की, मोदी सरकार पुन्हा येणार नाही, असं मोठं वक्तव्य राहुल गांधी बोलताना केलं. (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीरवर सत्यपाल मलिक काय म्हणाले?

सत्यपाल मलिक यांनी म्हटलं की, 'माझं म्हणणं आहे की,'जम्मू-काश्मीरच्या लोकांना बळजबरीने बदलू शकत नाही. तुम्ही तेथील लोकांना सोबत घेऊन जिंकल्यानंतर काहीही करू शकता. मी त्या लोकांना विश्वास घेतलंय'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Satyapal Malik
Narendra Modi Visits Maharashtra: PM नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा कसा असेल? 7500 कोटींची विकासकामं आणि बरंच काही...

सत्यपाल मलिक म्हणाले, 'मला वाटतं की, जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचा राज्याचा दर्जा परत मिळायला हवा. केंद्र सरकारने कलम ३७० मागे घेऊन केंद्रशासित राज्याचा दिला. केंद्र सरकारला भीती वाटत होती की, तेथील राज्याचे पोलीस बंड करतील. मात्र, जम्मू-काश्मीर पोलिसांनी नेहमीच केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचा दर्जा पुन्हा देणार असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र, त्यांनी लवकरच जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा द्यायला हवा. तसेच निवडणुका घ्यायला हव्यात'.

Satyapal Malik
Gujarat Fire: गुजरातमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, ६० टँकर जळून खाक

सत्यपाल मलिक पुढे म्हणाले, 'मला माहीत नाही की, राज्याचा दर्जाचा पुन्हा देणार की नाही. माझं बोलणं झालं होतं की, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा द्यायला हवा. मला त्यांनी म्हटलं की, दर्जा द्यायची गरज काय? सर्व व्यवस्थित सुरु आहे'. पण कुठं व्यवस्थित सुरू आहे. काही भागात दहशतवादी सक्रिय झाले आहेत'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com